
: गेल्या काही महिन्यांपासून भारत आणि बांगलादेशमधील द्विपक्षीय संबंध ताणले गेल्याचं चित्र निर्माण झालं आहे. यातच बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख मुहम्मद युनूस हे नुकतेच चीनच्या दौऱ्यावर गेले होते. त्यामुळे त्यांचा हा दौरा म्हणजे बांगलादेशकडून भारताला अप्रत्यक्ष संदेश असल्याचं बोललं जात होतं. यातच आता मुहम्मद युनूस यांनी बांगलादेशला ‘गार्डियन ऑफ द सी’ असं संबोधलं आहे. तसेच मोहम्मद युनूस यांनी चीनला बांगलादेशात अर्थव्यवस्थेचा विस्तार करण्याचं आमंत्रणही दिलं आहे.बांगलादेशचे मुख्य सल्लागार मुहम्मद युनूस म्हणाले की, चीनने बांगलादेशमध्ये आपला आर्थिक प्रभाव वाढवावा आणि या संदर्भात, भारताच्या पूर्वेकडील राज्यांना सर्व बाजूंनी जमिनीने वेढलेले असणे ही एक संधी ठरू शकते. युनूस यांनी त्यांच्या ४ दिवसांच्या चीन दौऱ्यादरम्यान ही टिप्पणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. सोमवारी त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर दिसला.चीनचे आधीपासूनच बांगलादेशसोबत व्यापारी संबंध असून हे अधिकाधिक वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न चीनकडून केला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे मुहम्मद युनूस यांनी पदभार स्वीकारल्यापासून चीनमधील किमान १४ कंपन्यांनी २३० मिलियन डॉलर्सहून अधिक गुंतवणूक बांगलादेशमध्ये केली आहे. बांगलादेशमध्ये चीनची वाढती गुंतवणूक भारतासाठी काळजीचा विषय ठरण्याची शक्यता आहे. शेजारी देशाच्या पायाभूत सुविधांसारख्या क्षेत्रात चीनचा वावर भारतासाठी डोकेदुखी ठरू शकतो.मोहम्मद युनूस नेमकं काय म्हणाले?“भारतातील सात ईशान्य राज्ये अजूनही भूपरिवेष्टित आहेत. त्यांच्याकडे महासागरापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही. या संपूर्ण प्रदेशासाठी बांगलादेश महासागराचे एकमेव रक्षक आहे. त्यामुळे हा चिनी अर्थव्यवस्थेचा विस्तार होऊ शकतो. त्यामुळे काही वस्तू तयार करा, उत्पादन करा आणि वस्तू बाजारात आणा, जगभरातील देशासांठी निर्यात करता येऊ शकतात”, असं मोहम्मद युनूस यांनी म्हटलं आहे.दरम्यान, मोहम्मद युनूस यांनी आपण चीन आणि बांगलादेश यांच्यातील संबंधांच्या नव्या टप्प्याची वाट पाहत असल्याचंही म्हटलं आहे. तसेच मोहम्मद युनूस यांनी चीनच्या दौऱ्यात चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचीही भेट घेतली. या भेटीत युनसू यांनी बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेला पुनरुज्जीवित करण्यासाठी चीनला गुंतवणूक वाढवण्याचं आवाहन केलं असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच युनूस यांनी चीनला बांगलादेशातील नद्या आणि पूर व्यवस्थापनासाठी ५० वर्षांचा मास्टर प्लॅन देण्याचं आवाहन केलं आहे. त्यामुळे मोहम्मद युनूस यांच्या या भूमिकेमुळे भविष्यात भारताची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.चीन आणि बांगलादेशमध्ये ९ करारांवर स्वाक्षऱ्या आता परिस्थिती वेगळी आहे, हसीना गेल्यापासून बांगलादेश-भारत संबंध फारसे सुरळीत राहिलेले नाहीत. चीन आणि बांगलादेशमध्ये एकूण ९ करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या आहेत. शी आणि युनूस यांच्यातील भेटीशी संबंधित एका विधानाकडेही भारताकडून फारसे सकारात्मक पाहिले जात नाही. फेसबुकवर पोस्ट केलेल्या युनूसच्या या कथित विधानात, युनूस भारताच्या सात ईशान्येकडील राज्यांचा उल्लेख करून चीनला सांगत आहेत की भारताकडे समुद्रापर्यंत पोहोचण्याचा कोणताही मार्ग नाही. त्या प्रदेशातील समुद्राचा एकमेव संरक्षक बांगलादेश आहे. चीन आणि बांगलादेशमधील ही जवळीक भारतासाठी अनेक प्रकारे चिंताजनक आहे. एकीकडे, भारताच्या सुरक्षेच्या चिंता तिस्ता नदी विकास प्रकल्पाशी जोडल्या गेल्या आहेत. याशिवाय, ईशान्येकडील देशांच्या दृष्टीने बांगलादेशने चीनला दिलेला प्रस्ताव देखील धोक्याची घंटा आहे.९५६१५९४३०६


