
ओझर: ( वार्ताहर)येथील बोरस्ते विद्यालयात मराठी भाषा संवर्धन उपक्रमांतर्गत परभणी येथील सुप्रसिद्ध कवी लेखक कथाकार प्रा राजेंद्र गहाळ यांनी कथाकथन व कविता गायन सादर केले. साहित्य मराठी भाषेचा आत्मा असून विद्यार्थ्यांना मराठी भाषेची गोडी लागावी म्हणून साहित्यावर मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांचे मनोरंजन केले. ‘जो वाचतो पुस्तक, त्याचा विकास साधतो मस्तक’ असे शेवटी विद्यार्थ्यांना त्यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. प्रास्ताविकात शिक्षिका राजर्षी पिंगळे यांनी राजेंद्र गहाळ यांच्या साहित्य संपदेचा परिचय करून दिला. तसेच निफाड महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा ज्ञानोबा ढगे यांनी तुकाराम महाराज जयंती निमित्त मराठी साहित्यावर मार्गदर्शन केले

यानिमित्त साहित्यिक प्रा राजेंद्र गव्हाळ प्राचार्य ज्ञानोबा ढगे यांचा मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी सत्कार केला. व्यासपीठावर अतिथी सेवानिवृत्त प्राचार्य विलासराव चटटे पाटील प्रा सुदाम लेंढे उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे सर्व मराठी भाषा शिक्षक उपस्थित होते. साहित्यिक राजेंद्र गहाळ यांनी विद्यालयास स्वलिखित व प्रकाशित झालेले कथासंग्रह कोंडी, दोन एकर, पोशिंदा सप्रेम भेट दिली.
