
नाशिक( प्रतिनिधी ):- कालिका देवी मंदिर संस्थान आणि नाशिकच्या विविध क्रीडा संघटना यांच्यातर्फे कल दिनांक ३१ जानेवारी रोजी कालिका मंदिर संस्थांनच्या हॉलमध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र्र ऑलीम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

या श्रद्धांजलीसाठी विविध राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते, पदाधिकारी, विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी, खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या आणि नगरसेवक हेमलता पाटील यांनी अजित पवार यांच्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. आमची गेल्या २५ वर्षांपासूनची जवळीक आहे आणि मी नाशिकच्या महानगर पालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्यावर पहिला फोन अजित दादांना केला होता आणि त्यांनी मला माझ्या पुढील कामासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

त्यांच्या अपधाती जाण्याने समाजाची फार मोठी हानी झाली आहे असे सांगितले. माजी आमदार नितीन भोसले यांनीही अजित दादा यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याबरोबरच क्रीडा क्षेत्रासाठी फार मोठे योगदान आहे. स्पर्धा आयोजन, खेळाडूंना विविध सुविधा, खेळाडूंच्या प्रगतीसाठी त्यांचे योगदान मोठे आहे असे त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश चिटणीस नानासाहेब महाले यांनी दादांच्या गेल्या २५ -३० वर्षाच्या राजकीय प्रवासाबद्दल बोलतांना सांगितले की, त्यांची पक्षशिस्त, वक्तशीरपणा, सकाळी सहा ते रात्री अकरा पर्यंत सतत काम करण्याची पद्धत, त्यांच्याकडे आलेल्या माणसाचे समाधान नक्कीच होणारही दादांची काम करण्याची पद्धत मी इतके वर्षे प्रत्यक्षात अनुभवलेली आहे असे सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि क्रीडा संघटक अर्जुन टिळे यांनी सांगितले की आमची रोज चर्चा होत असे. ते महाराष्ट्र ऑलीम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते. मिनी ऑलीम्पिक स्पर्धा नाशिकला आयोजित करण्यासाठी त्यांनी मला संमती दिली होती. क्रीडा संचालक प्रा. हेमंत पाटील यांनी सांगितले की, नाशिकमध्ये लावलेल्या मॅरेथॉन स्तंभाचे अजितदादा यांनी कौतुक करून नाशिकमध्ये पुण्याच्या पेक्षाही चांगले उपक्रम राबवले जातात असे सांगितले.नगरसेवक आणि राजकीय आणि सामाजिक नेते विद्यमान नगरसेवक सुरेश अण्णा पाटील यांनी सांगितले की कार्यकर्त्यांना कसे मोठे करायचे हे त्यांच्याकडून शिकावे असे सांगितले. मंदार देशमुख यांनी त्यांच्या खो-खो, कबड्डी कुस्ती या देशी या खेळाच्या संदर्भात अनेक महत्वपूर्ण घेतले, अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळे या खेळांच्या खेळाडूंना क्रिकेट खेळाडूंप्रमाणे सुविधा मिळाव्यात यासाठी दादा नेहमी आग्रही होते असे सांगितले. निवृत्त डी. वाय. एस. पी. चंद्रकांत बनकर यांनी त्यांच्या पोलिसा नोकरीच्या काळात अजित दादांच्या सोबतचे अनुभव व्यक्त केले. यावेळी राजेंद्र निंबाळते (स्विमिन्ग), हिरामण वाघ (कुस्ती), दीपक निकम ( सेपक टकरा) उदय खरे ( तलवारबाजी), अंबादास तांबे (रोईंग), चंद्रहास कुलकर्णी, अशोक बोरस्ते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. शेवटी कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष यांनी सांगितले की, महाराष्ट्राचे राष्ट्रीय नेते यशवंतराव चव्हाण, सुधाकरराव नाईक, शारदचंद्र पवार, विलासराव देशमुख यांनी जसे महाराष्ट्राचे नावं देशामध्ये उंच केले, त्या दर्जाचे अजितदादा पवार हे नेते होते. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रात कधीही भरून न निघणारी मोठी पोकळी निर्माण झाली आहे, त्यांच्या कार्याला असेच पुढे नेण्याचे काम आपण सर्वानी मिळून केले पाहिजे, हीच खऱ्या अर्थाने अजितदादांना अदारांजली राहील आहे सांगितले.या श्रद्धांजली सभेसाठी सुभाष तलाजीया, डॉ. प्रतापराव कोठावळे, दत्ता पाटील, अशोक दुधारे, आनंद खरे, राजू शिंदे, अविनाश खैरनार, शशांक वझे, नितीन हिंगमिरे, मनोज म्हस्के, भूषण भटाटे, उमेश सेनभक्त, कुणाल अहिरे आणि विविध खेळांचे खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी सर्वानी हात जोडून अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली.
