
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१६४ वा दिवस
परमेश्वराने नामानिराळे राहून या विश्वाची अलौकिक रचना केली. ज्याला नामानिराळे राहता येते, त्याच्या हातून फार मोठे कार्य होऊ शकते. तुम्ही 'स्व' चे स्वामी व्हा. म्हणजे त्रैलोक्याचेही स्वामी व्हाल! जो स्वामी असतो, त्याच्या पायाशी सर्व काही चालत येते. जो गुलाम असतो त्याच्या वाट्याला केवळ शून्य येते. स्वामी असणाऱ्यांचे जगातल्या शूद्र गोष्टींवाचून काही अडलेले नसते. तो त्यांच्याशिवायही आनंदाने जगतो. म्हणून मी म्हणतो, की कोणत्यातरी एका ध्येयाचा ध्यास घ्या. त्यासाठी जीवन अर्पण करा. ते ध्येय इतके मोठे असावे, की त्यापुढे अन्य सर्व गोष्टी विरघळून जाव्यात. त्याशिवाय इतर कशाला जीवनात जागाच राहू नये. वेळच राहू नये.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास ८ शके १९४७
★ माघ शुद्ध /शुक्ल १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २८ जानेवारी २०२६
★ १८५१ दुसरे बाजीराव पेशवे यांचे कानपूरजवळ “ब्रम्हावर्त” येथे निधन स्मृतीदिन
★ १८६५ स्वातंत्र्यसेनानी, पंजाब केसरी लाला लजपतराय यांची जयंती
★ १८९९ स्वतंत्र भारताचे पहिले लष्करप्रमुख फील्डमार्शल के. एम. करिअप्पा यांचा जन्मदिन
★ १९२५ भारतीय अणुऊर्जा आयोगाचे चौथे अध्यक्ष, शास्त्रज्ञ डॉ. राजा रामण्णा यांची जन्मदिन.
