
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१५९ वा दिवस
कर्मयोग म्हणजे - प्रत्यक्ष मृत्यू समोर असताही, ब्रही न काढता, न कचरता, निमूटपणे कुणालाही साहाय्य करणे. लाखो वेळा जरी लोकांनी तुम्हाला ठकविले, फसविले तरीसुद्धा तोंडावाटे चकार शब्द देखील काढू नका, आणि आपण म्हणजे काही मोठे चांगले काम करीत आहोत अशाही विचाराला मनात थारा देऊ नका. गरिबांना तुम्ही जे दान द्याल त्याविषयी कधीही बहादुरी, हुशारकी मिरवू नका, किंवा त्यांच्याकडून चुकून कधी कृतज्ञतेचीही अपेक्षा बाळगू नका; तर उलट त्यांनी तुम्हाला दया दाखविण्याची संधी दिली याबद्दल तुम्हीच त्यांच्याप्रती कृतज्ञ व्हा.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास ३ शके १९४७
★ माघ शुद्ध /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. २३ जानेवारी २०२६
★ वसंत पंचमी
★ संतश्रेष्ठ तुकाराम महाराज जयंती, देहू
★ १६६४ शहाजीराजे भोसले यांचे घोड्यावरून पडून अपघाती निधन
★ १८९७ आझाद हिंद सेनेचे सरसेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती
★ १९१९ नाटककार, कवी, विनोदी लेखक राम गणेश गडकरी (गोविंदाग्रज) यांचा स्मृतीदिन
★ १९२६ हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा जन्मदिन.
