
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१५८ वा दिवस
जेव्हा ग्रीस अस्तित्वात नव्हता. तेव्हा रोमची कल्पनाही कोणी केली नव्हती, आजच्या आधुनिक युरोपियनचे पूर्वज जेव्हा रानटी अवस्थेत जंगलात राहत होते आणि स्वतःची शरीरे रंगवीत होते तेव्हा या हिंदुस्थानात एक दैदिप्त्यमान 'संस्कृती' नांदत होती. इतिहासाकडे ज्यांची नोंद नाही, परंपराच्या गहन अंधारात डोकावून सुद्धा धजत नाहीत अशा काळापासून ही मातृभूमी एकामागून एक शुभ्र विचारांचे प्रेषण करीत आहे. उच्चारलेल्या प्रत्येक शब्दामागे आशीर्वाद, शांती यांचे स्निग्ध सामर्थ्य आहे. जगातले इतर वंश हे जेत्यांचे वंश होते, आपण मात्र जेत्यांचे वंश नव्हतो. आपल्या भाग्यात हे खरोखरच मोठे वरदान लाभले आहे. आजही आपण चैतन्यशील आहोत.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ/तपमास २ शके १९४७
★ माघ शुद्ध /शुक्ल ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २२ जानेवारी २०२६
★ विनायक चतुर्थी
★ श्री गणेश जन्मदिन
★ माघी गणेशोत्सव
★ आयोधा राममंदिर प्राणप्रतिष्ठा दिन.
★ १६६६ ताजमहालचा निर्माता मुघल बादशहा शहाजहान आपल्याच मुलाच्या (औरंगजेब) दहा वर्षे कैदेनंतर मृत्यु
★ १७३२ मराठा साम्राज्यातील पेशव्यांची राजधानी पुणे येथील शनिवार वाड्याची वास्तुशांती (तो दिवस शनिवार असल्याने वाड्याला शनिवार वाडा असे नामकरण)
★ १९७२ हैदराबाद मुक्ती संग्रामाचे नेते, समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ स्वामी रामानंद तीर्थ यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
