
मनमाड ( प्रतिनिधी ) मनमाडच्या वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदिरात सलग 30 व्या वर्षी श्री गणेश जन्म उत्सवा चे आयोजन सन 1997 साली मनमाड शहरातील ओम मित्र मंडळाने मनमाडच्या वेशीतील प्राचीन श्री निलमणी गणेश मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि त्याच वर्षा पासून (तिलकुंद चतुर्थी)( माघ शुद्ध चतुर्थी) माघी श्री महागणेश जन्मोत्सव निमित्त कार्यक्रम चे आयोजन सुरु करण्यात आले यंदाही अखंडितपणे सलग 30 व्या वर्षी आम्ही परंपरा पाळतो आम्ही संस्कृती चे रक्षण करतो हे ब्रीद वाक्य घेऊन कार्य करणाऱ्या श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट तर्फे श्री गणेश जन्म उत्सव निमित्ताने गुरुवार दिनांक 22/01/ 2026 रोजी भरगच्च धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मनमाड शहराचे आराध्य दैवत आणि नवसाला पावणारा गणपती पंचक्रोशीत प्रसिद्ध असणाऱ्या वेशीतील श्री निलमणी गणेश मंदिरात करण्यात आले आहे धार्मिक कार्यक्रम श्री निलमणी महागणेशास सकाळी ठीक. 6-00 वाजता महाभिषेक महापूजा, 2 सकाळी ठीक. 9-00 वाजता श्री। सत्यविनायक महापूजा ‼3 रात्री ठीक.8-00 महाआरती व महाप्रसाद वाटप ( अन्नपूर्णा महासेवा) तरी मनमाड शहर व परिसरातील सर्व गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने या धार्मिक कार्यक्रमांना उपस्थित राहून प्रत्यक्ष सहभाग घ्यावा असे आवाहन ट्रस्ट तर्फे विश्वस्त मंडळा ने केले आहे महाअभिषेक आणि महाआरती चे वेळी सामूहिक श्री गणपती अथर्वशीर्ष पठण संपन्न होणार आहे.या धार्मिक कार्यक्रमां चा लाभ घ्यावा ही सर्व श्रीगणेश भक्तांना ही नम्र विनंती आपले विनीत विश्वस्त मंडळ
श्री निलमणी गणेश मंदिर सार्वजनिक ट्रस्ट मनमाड
