
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१५७ वा दिवस
गहन आणि विशाल सरितापात्रे, त्यातून दुथडी भरून अवखळपणे वाहणारे पाणी, नंदनवनाला लाजवतील अशी नद्यांच्या काठावरची सुरम्य उद्याने, त्या उद्यानांमधले सुंदर संगमरवरी प्रसाद, त्यांच्यावर कोरलेल्या अनंत देखण्या कलाकृती ही हिंदुस्थानच्या चित्राची एक बाजू. त्याच प्रसादाच्या मागे, पुढे, आजूबाजूला, सभोवती खोपटांची गर्दी. त्यांच्या मातीच्या मोडकळीस आलेल्या, पडझड झालेल्या भिंती. त्यावर कशीबशी सावरुन धरलेली फाटकी छते. भोवती वावरणारी फाटक्या चिंध्यांमधील लहान मोठी माणसे; त्यांच्या मुद्रांवर शतकानुशतके दुःख दारिद्र्याचे खोलवर उमटलेले चरे; गाई म्हशी गुरे यांच्या डोळ्यांतही तोच उदास, करूण भाव; ही हिंदुस्थानच्या चित्राची दुसरी बाजू आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर माघ (तपमास) शके १९४७
★ माघ शुद्ध /शुक्ल ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. २१ जानेवारी २०२६
★ १८९४ कवी, कोशकार, छंदशास्त्राचे व्यासंगी आणि मराठी भाषाशुद्धीचे तत्त्वनिष्ठ पुरस्कर्ते माधव त्र्यंबक पटवर्धन उर्फ ’माधव जूलियन’ यांचा जन्मदिन
★ १९१० चित्रपट दिग्दर्शक, लेखक, कवी व गीतकार शांताराम आठवले यांचा जन्मदिन
★ १९२४ माजी केंद्रीय मंत्री, जेष्ठ समाजवादी नेते मधु दंडवते यांची जयंती
★ १९४५ आझाद हिंद सेनेचे संस्थापक रासबिहारी बोस यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
