
नांदगाव (वार्ताहार )वैजनाथ जिजाजी माध्यमिक विद्यालय नांदगावया शाळेचा १ एप्रिल २० २५ रोजी शाळेचा १०६ वा वर्धापन दिन मोठ्या दिमाखदार पद्धतीने सोहळा संपन्न झालाकार्यक्रमाचे अध्यक्ष शालेय समितीचे अध्यक्ष श्री. संजीव धामणे प्रमुख पाहुणे श्री. मंदार रत्नपारखी (संस्था सदस्य ) माजी शिक्षक श्री. चव्हाण भै.ता.श्री डॉ. सचिन अत्रे श्री. अविनाश कुलकणी (माजी विद्यार्थी १९९५ ) मा. मुख्या श्री ठाकरे एल एन पर्यवेक्षक श्री मिलींद कायस्थ सदस्य श्री. मधे सर श्री गुलाब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते

पाहुण्यांचा परिचय श्रीमती शिंदें संगिता यांनी करून दिला .मा. मुख्या श्री. ठाकरे सरांनी प्रास्ताविकातून शाळेची माहिती दिली वर्धापनदिन निमित्त १०६ वर्षाची परंपरा असलेल्या संस्थेचा इतिहास श्री. आहिरे प्रविण यांनी अतिशय समर्पक पद्धतीने शाळेचा आलेख विद्यार्थ्यांसमोर मांडला आज या वर्धापन दिनानिमित्त शाळेचे माजी आजी विद्यार्थी यांचे हस्ते केक कापून शाळेचा वर्धापनदिन साजरा केला

या प्रसंगी शाळेचे माजी विद्यार्थी सन १९९५ बॅच मधील विद्यार्थ्यांनी गुरुदक्षिणा सभागृहासाठी १९० खुर्च्या भेट दिल्या . कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीव धामणे यांनी शाळेचा उज्वल परंपरे विषयी शाळेचा विकास कसा झाला ते सांगितले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन श्रीम देवरे सुनिता दौलत यांनी मानले तरकार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. मिलिंद कायस्थ यांनी मानलेप्रसंगी शाळेतील सर्व विद्यार्थानां खाऊ वाटपानंतर कार्यक्रमाची सांगता झाली .

