
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१५६ वा दिवस
एव भव्य सुंदर वास्तू गतकालीन वैभवाचा अवशेष आजही आपल्याकडे टिकून आहे ही वास्तू दुर्लक्ष केल्याने, वावर नसल्याने पडीक होऊन राहिली आहे. भग्न झाली आहे. तिथे धूळ कचऱ्याचे पुटे जमली आहेत. काही पडझड झाली आहे. या वास्तूचे तुम्ही काय कराल? आवश्यक ती स्वच्छता कराल, डागडुजी कराल आणि ती पूर्वत उभी कराल, की जी आहे तीही मातीला मिळवून तिच्या जागी जिच्या पक्केपणाची काही शाश्वती देता येत नाही अशी नवी वास्तू बांधाल? आपण या जुन्याच वास्तूची पुनर्बांधणी केली पाहिजे. संपूर्ण वास्तु भिन्न करण्यात लाभ काय? पुनर्बांधणी हेच सुधारणेचे ध्येय असले पाहिजे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष ३० शके १९४७
★ माघ शुद्ध /शुक्ल २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. २० जानेवारी २०२६
★ १९८८ खान अब्दुल गफार खान तथा ‘सरहद्द गांधी’ यांचा स्मृतीदिन
★ २००२ भारतीय गुप्तचर संस्थेचे (RAW) संस्थापक अध्यक्ष (अध्वर्यू) रामेश्वरनाथ कावो यांचा स्मृतीदिन
★ २००९ अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष बराक हुसेन ओबामा यांचा शपथविधी.
