
. जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष वृक्षमित्र कै. रोडूआण्णा पाटील यांच्या ८३ व्या जयंतीदिनी गो. य. पाटील विद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी संजय चोरमले व मान्यवरांच्या हस्ते रोडूआण्णांच्या समाधीचे व प्रतिमेचे पूजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील होत्या. समवेत सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक, विश्वस्त, सरपंच वाल्ह्याबाई पटांग्रे, दगडू पटांग्रे, विलास अहिरे, पोपट कोरे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थ प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित.

प्रसंगी वक्तृत्व स्पर्धेत पाचवी ते सातवी लहान गटात संतोषी माने, श्रावणी आहिरे, रोशनी गायकवाड यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. आठवी ते दहावीच्या मधल्या गटात अक्षदा कऱ्हे, दिव्या कडनोर, श्रावणी ठोंबरे, यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला. तर ११वी, १२वी या मोठ्या गटात ऋतुजा रायते प्रथम, ऋतुजा साळुंके द्वितीय व उन्नती देवरे हिने तृतीय क्रमांक पटकाविला यशस्वीतांना स्मृतीचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. प्रसंगी एस. एस. सी. परीक्षेत इंग्रजी विषयात सर्वाधिक ९३ गुण मिळवणारी जयश्री ढोणे हिला इंग्रजीचे शिक्षक आर. जे. जाधव यांच्या हस्ते बक्षिस देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविक अजिंक्य साळुंके यांनी केले, सूत्रसंचलन प्रा. सी. डी. राजपूत यांनी केले तर आभार प्रा. पी. यु. शिंदे यांनी मानलेत.
