
READING@आपलं गोरेगाव*वाचनसंस्कृती लयाला जात आहे. मुलं वाचत नाहीत, इन फॅक्ट कोणीच वाचत नाही, स्क्रिनटाईम गरजेपेक्षा अधिक प्रमाणात वाढला आहे, वाचनासाठी वेगळा वेळ काढता येत नाही ही आजची सार्वत्रिक ओरड आहे. पण यावर केवळ चर्चा करून उपयोग नाही, तर कृतीपूर्ण उपाययोजना आवश्यक आहे. आणि याची सुरुवात स्वतःपासूनच व्हायला हवी, नाही का? म्हणूनच आम्ही गोरेगावकर नागरिक घेऊन येत आहोत “READING@आपलं गोरेगाव” नावाचा एक एक आगळावेगळा उपक्रम. गोरेगावकर नागरिकांच्या प्रेरणेतून सुरू होत आहे हा एक नवा उपक्रम. वाचणाऱ्या आणि वाचनाची इच्छा असणाऱ्या प्रत्येकासाठी खास जागा. एक खास दिवस वाचनाला समर्पित. मोठ्यांनी या, छोट्यांनीही या. तुम्हाला हव्या त्या भाषेतलं पुस्तक घेऊन या. दर आठवड्याच्या अखेरीस, म्हणजे शनिवारी संध्याकाळी आपण, वाचकप्रेमी गोरेगावकर केवळ वाचनासाठी ठरलेल्या ठिकाणी जमणार आहोत. आता आपला लाडका शनिवार होणार आहे वाचनवार. वीकेंडची मज्जा आता घेऊया आवडत्या लेखकांच्या, आवडीच्या पुस्तकांच्या सान्निध्यात. हा वेळ असेल आपला आणि पुस्तकाचा #metime. मोबाईल, टॅब अशी स्क्रीन्सला या काळापुरतं दूर ठेवून समर्पितपणे वाचन करण्याचा संकल्प आपण करायचा आहे, तो तडीसही न्यायचा आहे. येत्या ५ एप्रिलपासून READING@आपलं गोरेगाव हा उपक्रम सुरू होत आहे. *कधी* – दर शनिवारी, सायंकाळी ४-३० ते ६-००*कुठे* – जयप्रकाश नारायण उद्यान, जयप्रकाश नगर, गोरेगाव पूर्व*सोबत आणणे* – आपलं पुस्तक, पाण्याची बाटली आणि बसण्यासाठी छोटी चटई किंवा बैठक#reading_at_apla_goregaon #reading #reading_at_आपलं_गोरेगाव

