
वाखारी (प्रतिनिधी ) मविप्र समाजाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय नांदगाव व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने वाखारी येथे राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रम संस्कार शिबीर दिनांक ८/१/२०२६ ते १४/१/२०२६ पर्यंत होत आहे. चौथ्या दिवशी पहिल्या सत्रात रा.से.यो.चे कार्यक्रम अधिकारी डॉ. बी.एम. आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी स्वयंसेवकांनी वाखारी जिल्हा परिषद शाळेचे परिसर स्वच्छ केले. गावातील फारवर्षापूर्वी येथे वाघ मेला होता म्हणून त्या वाघांचे नाव असलेल्या गावाजवळून वाहनाऱ्या वाघ नदीवर स्वयंसेवकांनी सिमेंटच्या गोण्यामध्ये वाळू ,दगड ,मातीच्या साह्याने बंधारा बांधला त्यामुळे शेजारच्या शेतकऱ्याच्या विहिरीच्या पाणीपातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे

तसेच संबंधित परिसर दुष्काळी असल्याने वन्य प्राण्यांना उन्हाळ्यात थोडा आधार मिळेल त्यामुळे एक प्रकारे प्राण्यांच्या दादा म्हणजे वाघाला आनंद झाला. दुसऱ्या बौद्धिक सत्रात महाविद्यालयातील भौतिक शास्त्राचे प्रा. आर. व्ही. वाघ यांनी नितीमुल्य या विषयावर स्वयंसेवकांशी संवाद साधला. याप्रसंगी प्रा.श्रीमती व्ही. गोराडे, रा.से.यो. सहायक कार्यक्रम अधिकारी डॉ.डी.डी. ठाकरे, प्रा.श्रीमती पी.डी. पाटील, श्री विलास आहेर, श्री गोरख काकळीज व स्वयंसेवक उपस्थित होते.
