राज्यातील ४३८ खेळाडूंचा सहभाग.
आनंद- लावण्या, श्रीकांत- कविता, सुरेश – सुरेखा, विपुल-सुषमा, योगेश- नीना, मेनेका- रेमंड भ्रमर-गुरमितसिंघ, शिरीष-वंदना, महे, उदय, अर्जुन- श्रीकांत नाशिकमध्ये राज्य बॅडमिंटन खेळाच्या महाकुंभाला शानदार सुरवात.उपान्त्य फेरीत दाखल.

नाशिक (प्रतिनिधी), दिनांक ११ जानेवारी :- नाशिक जिल्हा बॅडमिंटन असोसिएशनच्या वतीने आणि महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली नाशिक येथे दिनांक ११ जानेवारी ते १५ जानेवारी, २०२६ दरम्यान आयोजित ३५ वर्षे आणि त्यावरील विविध नऊ वयोगटाच्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बॅडमिंटन स्पर्धेला आज मोठ्या उत्साहात सुरवात झाली. नाशिकच्या गंगापूर रोड येथील केन्सिंगटन क्लब येथे आयोजित या स्पर्धेचे उदघाटन केन्सिंगटन क्लबचे संचालक विक्रांत मते यांच्या हस्ते आणि नाशिक बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, सचिव पराग एकांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. शर्मिला कुलकर्णी, उपाध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष योगेश एकबोटे, सहसचिव दिलीप लोंढे, खजिनदार समीर रहाळकर,कार्यकारी सदस्य चंदन जाधव, संदीप म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले.

दीप प्रज्वलन करून या स्पर्धेचे औपचारिक उद्घाटन पार पडले. यावेळी बोलतांना विक्रांत मते यांनी सांगितले की, नियमित स्पर्धात्मक खेळ करणाऱ्या खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये संधी मिळते. परंतु याचप्रमाणे ३५ वर्षे ते ७५ वर्षे अश्या नऊ विविध गटांमध्ये खेळणारे खेळाडू फिट राहावे आणि त्यांच्या माध्यमातून नियमित स्पर्धात्मक खेळामध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंना योग्य मार्गदर्शन मिळावे यासाठी या विविध वयोगटाच्या स्पर्धाना तितकेच महत्व आहे असे सांगितले.

या स्पर्धेमध्ये ३५ वर्षावरील गट, ४० वर्षे. ४५ वर्षे, ५० वर्षे, ६० वर्षे, ६५ वर्षे, ७० वर्षे आणि ७५ वषर्षावरील गट अश्या पुरुष आणि महिलांच्या नऊ गटामध्ये स्पर्धा खेळविल्या जात आहेत. रंगणार आहेत. यामध्ये एकेरी (सिंगल्स), दुहेरी (डबल्स) आणि मिश्र दुहेरी (मिक्स डबल्स) या तीन प्रकाराचा अंतर्भाव आहे. त्याप्रमाणे या स्पर्धा खेळविल्या जात आहेत. आज दिनांक ११ जानेवारी ते १३ जानेवारी दरम्यान ५५ वर्षे, ६०वर्षे, ६५ वर्षे, ७० वर्षे आणि ७५ वर्षावरील गट या पाच गटांच्या स्पर्धा खेळविल्या जात आहेत.

उदघाटनानंतर सुरु झालेल्या या स्पर्धेमध्ये ५५ वर्षे वरील गटामध्ये पुणेच्या शशिकुमार आय्यर यांनी सुंदर खेळाचे प्रदर्शन करून उपउपांत्य फेरीत मुंबईच्या दीपककुमार दमाणी यांचा ११-१५, १५-०५, १५-१२ असा २-१ ने पराभव करून उपांत्य फेरी गाठली. नाशिकचे खेळाडू चमकले :- याच गटात नाशिकच्या महेश बालानी यांनी रायगडच्या मिलिंद घरत यांचा ११-१५, १५-११ आणि १५-१० असा पराभव करून उपांत्य फ्री गाठली. दुहेरी या प्रकारच्या ५५ वर्षे गटामध्ये नाशिकच्या महेश बालानी आणि शिरीष घन या जोडीने ठाणे – रायगडच्या आशिष हिर्लेकर आणि मिलिंद घरत या जोडाचा २०-१८, १०-१५ आणि १५-१० असा २-१ फरकाने पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. याचबरोबर या गटात मिश्र दुहेरी प्रकारात नाशिकच्या शिरीष घन आणि वंदना जैस्वाल या जोडीने सुदर खेळ करून ठाणे आणि पुणे यांच्या अविनाश गोडे आणि जोशी यांना पराभुत करून उपांत्य फेरी आपले स्थान पक्के केले. या स्पर्धा महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशन यांच्या अधिकृत नियमावलीनुसार खेळविल्या जात आहेत.

या स्पर्धेला “योनेक्स सनराईस” यांनी पुरस्कृत केले आहे. या स्पर्धाच्या सूत्रबद्ध आयोजनासाठी महाराष्ट्र बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष अरुण लाखनी, कार्याध्यक्ष शिरीष बोराळकर, उपाध्यक्ष मंगेश काशीकर, राज्य सचिव सिद्धार्थ पाटील, उपाध्यक्ष सुधीर गाडगीळ, पंकज ठाकूर, ओंकार हजारे, मुंबईचे सचिन भारती, नाशिक बॅडमिंटन असोसिएशनचे अध्यक्ष राधेश्याम मुंदडा, सचिव पराग एकांडे, वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. शर्मिला कुलकर्णी, उपाध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष योगेश एकबोटे, सहसचिव दिलीप लोंढे, खजिनदार समीर रहाळकर,कार्यकारी सदस्य चंदन जाधव, संदीप म्हात्रे आदी परिश्रम घेत आहेत. याचबरोबर डॉ. सुचिता बच्छाव, अश्विन सोनावणे, विशाल शाह, उदय एकांडे, प्रमोद रानडे, अनंत जोशी, रिषभ गोलिया, आदित्य आर्डे, हर्षद टेम्बुर्णीकर आदी या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत.

आजचे निकाल :-
उपउपांत्य सामने :-१) मिश्र दुहेरी ५५ वर्षे – १) आनंद विठ्ठलकर आणि लावण्या पवार (मुंबई विजयी विरुद्ध योगेश एकबोटे आणि विद्या म्हात्रे (नाशिक)२) श्रीकांत श्रुष्टि आणि कविता जैन (पुणे-मुंबई) विजयी विरुद्ध हितेंद्र निखारे आणि माधवी कुरुमभट्टी (पुणे- मुंबई)३) उदय गायकवाड आणि संजीवनी महाजन (ठाणे -पुणे) विजयी विरुद्ध शशिकुमार अय्यर आणि शोभा प्रकाश (पुणे- मुंबई)४) शिरीष घन आणि वंदना जैस्वाल (नाशिक) विजयी विरुद्ध अविनाश गोडे आणि दिली जोशी (ठाणे-पुणे)पुरुष दुहेरी :-१) मानिके दारूवाला आणि रेमॉन्ड रॉड्रीगेस (मुंबई) विजयी विरुद्ध कमलाकर चौतमल आणि राजीव शेतकर (छ. संभाजी नगर)२) भ्रमर सेंगर आणि गुरमितसिंघ मथारू (नाशिक- छ. संभाजी नगर) विजयी विरुद्ध हिमांशू वैद्य आणि योगेश संघवी (मुंबई)
