
नाशिक येथे अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन 17 व 18 जानेवारी 2026 या कालावधीत पंचवटीतील मखमलाबाद रोडवरील भावबंधन मंगल कार्यालय येथे चौथे अखिल भारतीय शेकोटी लोककला साहित्य संमेलन गिरणा गौरव प्रतिष्ठानने आयोजित केले आहेत. या संमेलनाच्या नियोजनाची पहिली बैठक नुकतीच नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील हुतात्मा स्मारकात झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार होते. तर व्यासपीठावर रवींद्र मालुंजकर समन्वयक, किरण सोनार, ज्येष्ठ साहित्य प्राचार्य कुलकर्णी ज्येष्ठ साहित्यिका अलकाताई दराडे होते. संमेलनाची रूपरेषा कशी असावी याबाबत गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले. बैठकीत साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कोण असावेत, स्वागत अध्यक्ष उद्घाटक,साहित्य नगरीला कुणाचे नाव असावे,डॉ. शंकर बोऱ्हाडे लोककला साहित्य पुरस्काराचे यंदाचे मानकरी कोण या शिवाय गझल संमेलन, कवी संमेलन, अहिराणी कवी संमेलन, बालकवी संमेलन, पुरुष परिसंवाद, महिला परिसंवाद, कथाकथन यासह यावर्षी उमराणे तालुका देवळा येथील शंभर वर्ष जुनी परंपरा असलेला कलगीतुरा या विशेष कार्यक्रमाचे सादरीकरण करण्याचा ठरावही करण्यात आला शाहीर बाजीराव सोनवणे व कलगीतुरा मंडळ ही कला सादर करणार आहेत. तसेच स्वागत समिती लावणी स्पर्धा, दोन दिवस चालणाऱ्या भरगच्च कार्यक्रमात अठरापगड जातीच्या लोककला संमेलनात सादर करण्यात येणार आहेत. अशी माहिती साहित्य संमेलनाचे प्रसिद्धी प्रमुख पोपटराव देवरे यांनी दिली. यावेळी विविध समित्यांची जबाबदारी सोपविण्यात आली. प्रत्येक विषयाची चर्चा करून विविध समित्यांचे गठन करण्यात आले. व संबंधितांवर जबाबदारी देण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत मनुशट्टीवार, पुंजाजी मालुंजकर,राजेंद्र उगले, सुहास टिपरे,साहेबराव नंदन, अड.सोमदत्त मुंजवाडकर, प्राचार्य डॉ. गिरीश पाटील, मधुकर गिरी,अशोक कुमावत,सोमनाथ साखरे, पोपटराव देवरे ज्येष्ठ साहित्यिका अलकाताई दराडे, नंदा पाटील, शितल कुईटे, प्राचार्य मानसी देशमुख, उज्वला वडनेरे,माधुरी अमृतकर,अलका अमृतकर,कामगार भूषण रामचंद्र शिंदे, भाग्यश्री चौधरी, सविता दरेकर, सविता पोतदार, सुजाता येवले, राजेंद्र सोमवंशी, दत्तू दाणी, आदींनी सहभाग नोंदवला बैठकीस नाशिक जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातील साहित्यिक व लोककलाकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर समन्वयक किरण सोनार यांनी सर्वांचे आभार मानले.
