
नाशिक (प्रतिनिधी): पोलीस दलाच्या वर्धापन दिनानिमित्त न्यू दारणा हायस्कूलच्या इयत्ता आठवी ते दहावीतील विद्यार्थ्यांनी आज दिनांक ५ जानेवारी २०२६ रोजी सीपी ऑफिस, नाशिकला शैक्षणिक भेट दिली. शाळेचे उपक्रमशील मुख्याध्यापक माननीय श्री. कुनगर सर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम पार पडला.
या भेटीदरम्यान सहाय्यक पोलीस आयुक्त (वाहतूक विभाग) श्रीमती अद्विता शिंदे, पोलीस हवालदार श्री. सचिन जाधव तसेच पी. एस. आय. श्री. विजयजी लभडे यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.
- आवक-जावक व चारित्र्य पडताळणी प्रक्रिया
- सिग्नल नियंत्रण कक्षाचे कार्य
- सायबर सुरक्षिततेचे महत्त्व
- आपत्कालीन परिस्थितीत 112 नंबरवर त्वरित कॉल करण्याची सूचना
- पासपोर्टसंबंधी मार्गदर्शन
- विविध ऑनलाइन गुन्हेगारी प्रकारांविषयी जागरूकता
या उपक्रमाला नाशिक मनपा शिक्षण विभागाच्या प्रशासनाधिकारी आदरणीय चौधरी मॅडम
यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे व शाळेचे कौतुक केले. त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक श्री. कुनगर सर तसेच सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले.
शाळेचे तडफदार गुरुजन माननीय श्री. पगार बी. एम. सर, श्री. पगार डी. आर. सर, श्री. कुशारे सर व श्री. पाटील सर यांनी या उपक्रमास मोलाचा हातभार लावला.
या भेटीद्वारे विद्यार्थ्यांना पोलीस विभागाचे कार्य, सुरक्षिततेचे नियम व नागरिक म्हणून जबाबदारी याबाबत थेट अनुभव मिळाला.
