
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मृतिदिनानिमित्ताने विचार व्यक्त करताना प्राचार्य दवंगे व आदी
कसबे सुकेणे (प्रतिनिधी) – प्रत्येक विद्यार्थ्याने छत्रपती संभाजी महाराजांचे चरित्र व इतिहास अभ्यासणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मौजे सुकेणे विद्यालयाचे प्राचार्य रायभान दवंगे यांनी केले ते विद्यालयात आयोजित धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्मृतिदिन कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष मनोगतातून विचार व्यक्त करत होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे, उपमुख्याध्यापक अनिल परदेशी व उपस्थिताच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी प्राचार्य दवंगे यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकत असताना त्यांनी स्वराज्यासाठी केलेले कार्य कोणतीही लढाई न हरता शत्रूवर मिळवलेला विजय व 40 दिवस मृत्यूशी झुंज देऊन स्वराज्यासाठी दिलेले बलिदान याशिवाय त्यांची बुद्धिमत्ता व धर्मनिष्ठा वाखाण्याजोगे असल्याचे प्रतिपादन केले यावेळी संगीत शिक्षक रामेश्वर धोंगडे यांनी संभाजी महाराजांचा इतिहासच विद्यार्थ्यांसमोर उभा केला प्रास्ताविक व सूत्रसंचालन कवी शिक्षक मुकुंद ताकाटे यांनी केले फलक लेखन कला शिक्षिका श्रीमती आरती मोरे यांनी केले आभार क्रीडा शिक्षक बाळासाहेब गडाख यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
