

नाशिक:( प्रतिनिधी ) नाशिक मधील काही हौशी कलावंतांनी एकत्र येत पंचवटी ललित कला मंडळाची स्थापना केली असून यात नाशिकमधील नाट्य कलावंत, संगीतकार, लोककलावंत, गायक, साहित्यिक, विधिज्ञ, उपक्रमशील शिक्षक अशा सर्वांनी एकत्र येऊन नुकतीच ‘पंचवटी ललित कला मंडळाची’ स्थापना केली असून लवकरच ‘पलकमं’ च्या बोधचिन्हाचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहेत. या निमित्ताने एकपात्री, सोलो वादन, काव्यवाचन, गायन, एकलनृत्य इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक स्पर्धेची प्रवेश फी शंभर रुपये असून स्पर्धकांनी कवितेव्यतिरिक्त सर्व स्पर्धांचे व्हिडीओ मंडळाने दिलेल्या संपर्क नंबरवर पाठवायचे आहेत. कविता पीडीएफ स्वरूपात पाठवायची आहे. फक्त एकपात्री या स्पर्धेसाठी पाच मिनिटांचा वेळ असून इतर स्पर्धांसाठी तीन मिनिटांचा वेळ आहे. तरी इच्छुकांनी मंडळाचे अध्यक्ष अरुण इंगळे (९९२२९९४२४३), सचिव प्राचार्य राजेश्वर शेळके (९४२३५४२२२४), संपर्क प्रमुख राजेंद्र उगले (९९२२९९४२४३) या नंबरवर संपर्क साधावा. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. तरी जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंडळाने केले आहे.
