
नाशिक ( प्रतिनिधी )महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित रेणुकाबाई भाऊसाहेब हिरे प्राथमिक विद्यालय, गंगापूर रोड नाशिक पाच.
विद्यालयात 3 जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक एस, पी, पवार सर होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्था प्रतिनिधी सुजाता पवार प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक नंदू पवार व्यासपीठावर उपस्थित होते.अध्यक्ष व प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून शाळेतील विद्यार्थ्यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावर भाषणे केली.त्यात इयत्ता पहिली स्वरा दुरतकर, इयत्ता तिसरीतील राज जाधव, दीपक वायकुंडे, निशा शेवरे, सोनल दाढे लावण्या बोरसे, ज्योसना खुरकुटे इयत्ता चौथीतील मृणाल चौधरी, धनश्री खोटरे या विद्यार्थ्यांनी भाषणातून सावित्रीबाईंचे शैक्षणिक कार्य मांडले. प्रमुख वक्ता म्हणून सीमाराणी बागुल यांनी आपल्या मनोगतातून सावित्रीबाईंचा जीवनपट मांडला व कविता सादर केली.संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फुला शिंदे यांनी केले.तर आभार कांतीलाल मोरे यांनी मानले.
