
मुळ डोंगरी ( प्रतिनिधी) 29 मार्च छत्रपती संभाजी महाराज पुण्यतिथी श्री संत सेवालाल महाराज सेवाभावी संस्था संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालय मुळडोंगरी विद्यालयात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री एस. जी.राठोड साहेब व संस्थचे सचिव श्री सिद्धांत दादा राठोड विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती एस. एस.चव्हाण मॅडम व जुनिअर कॉलेजचे प्रा.श्री पवार सर यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.

तसेच विद्यालयातील सहशिक्षक श्री मनोज जाधव सर यांनी महाराजांच्या शौर्याच्या व पराक्रमाची गाथा विद्यार्थ्यांसमोर सुंदर या शब्दात व्यक्त केली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती माळी मॅडम यांनी केले. व इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. अशा प्रकारे हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
