
.कै.महादेवी बाळासाहेब झळके
सिन्नर (प्रतिनिधी)देवळालीगाव (ना. रोड) येथील वीरशैव लिंगायत समाजाचे कार्यकर्ते, लिंगायत संघर्ष समितीचे पदाधिकारी प्रवीण झळके यांच्या काकू महादेवी बाळासाहेब झळके(वय ५४) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. वीरशैव लिंगायत समाजात अंत्यविधी करताना पार्थिव जमिनीत पाच ते सहा फूट खोलवर खड्डा घेऊन दफन करण्याची प्रथा आहे. त्याला समाधिविधी संबोधले जाते. परंतु परिवर्तन काळाची गरज आहे हे ओळखून व दिवसेंदिवस अंत्यविधीसाठी पुरेशी जागा उपलब्ध होत नसल्याने अंग्निसंस्कार तसेच देहदान ,अवयवदान सारख्या पद्धतींचा अवलंब करून समाजात जनजागृती करण्यासाठी आमची त्या दृष्टीने वाटचाल सुरू असल्याची माहिती ज्येष्ठ पत्रकार तसेच सामाजिक कार्यकर्ते डॉ.श्यामसुंदर झळके यांनी दिली. कालानुरूप बदल करणे काळाची गरज आहे असे मत त्यांनी व्यक्त केले.
