
सिन्नर (प्रतिनिधी ) सगर विद्या प्रसारक शिक्षण संस्था, सिन्नर संचलित महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात राजा सगर यांची जयंती मोठ्या उत्साहात संपन्न.. राजा सगर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य मा.देशमुख एम.एन.,उच्च माध्य.विभाग उपप्राचार्य माळी ई.जी.,काकडे पी.जी.,मुख्याध्यापिका संगीता राजगुरू प्राथ. विभाग व प्रमुख वक्ते अरविंद लोणारे यांच्या हस्ते करण्यात आले. अरविंद लोणारे यांनी राजा सगर व जिरेमाळी समाज यांचा परस्पर असलेला संबंध तसेच प्राचार्य यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी भगीरथ प्रयत्न करून शैक्षणिक शाखा विस्ताररुपी गंगा निर्माण व्हावी असे ध्येय सर्वांनी ठेवावे असे सांगितले.कार्यक्रमाचे संयोजन माधुरी वरंदळ,पल्लवी गवारे यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार क्रीडाशिक्षक किरण मिठे यांनी मानले.तसेच मराठी नववर्षाच्या सर्वांना संस्थेचे अध्यक्ष नामदेव लोंढे सो.,सेक्रेटरी नामदेव लोणारे सो.,व संचालक मंडळातर्फे हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.याप्रसंगी सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
