
.आपल्या प्रयत्नांनी जर इतरांना न्याय मिळून त्यांच्या पदरात काही मिळत असेल तर त्यासाठी आपण लढलं पाहिजे ही मानसिकता ठेवून नाशिक जिल्ह्यामध्ये ज्या काही मोजक्या नेत्यांनी आपलं कर्तृत्व सिद्ध केलं आहे त्यामध्ये एक महत्त्वाचं नाव आहे शिक्षक नेते संजय पांडुरंग चव्हाण……शिक्षक संघटनेच्य अत्यंत संघर्षमय व प्रतिकूल काळात शिक्षक आमदार विभागाची निवडणूक लढवून संघटनेची ताकद वाढविण्यासाठी अटोकाट प्रयत्न केले. नाशिक जिल्हा शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी पतसंस्थेचे पदाधिकारी म्हणून अनेक वर्ष कामकाज पाहिले त्यासाठी एक खंबीर नेतृत्व म्हणून शिक्षक सेनेचे विभागीय अध्यक्ष मा. संजय चव्हाण सर यांचा उल्लेख आवर्जून आपल्याला करावा लागेल. शालेय जीवनापासून विद्यार्थी चळवळीशी निगडित असलेलं त्याचं व्यक्तित्व महाविद्यालयीन जीवनामध्ये युवकांचे यशस्वीपणे नेतृत्व करीत होतं. त्यानंतर शिक्षण क्षेत्रात आल्यानंतर शिक्षकांच्या वेगवेगळ्या समस्या व त्यावर उपाय शोधायचा असेल तर मग संघर्ष करावा लागला तरी हरकत नाही परंतु शिक्षकांना न्याय मिळवून देणे अशा प्रकारची ठाम भूमिका घेणारा नेता जो शिक्षकांना भावला तो म्हणजे संजय चव्हाण सर.

…सेवाज्येष्ठतेचे प्रश्न,पदोन्नतीचे प्रश्न , मेडिकल बिलांचे प्रश्न , संस्थेचा व शिक्षकांचा संघर्ष असेल अशा प्रकारच्या समस्यांसाठी शिक्षण विभागाशी योग्य व न्यायिक लढा देऊन न्याय मिळवण्यासाठी प्रयत्न केले.शाळा आस्थापनांमध्ये शिक्षकांवर होणा-या अन्याय विरुद्ध सातत्याने लढण्याची भूमिका शिक्षक नेते संजय चव्हाण सर यांनी घेतली व वेगवेगळ्या शाळा आस्थापनांमध्ये शिक्षक सेनेच्या शाखांची मुहूर्तमेढ रोवली आणि म्हणूनच ते खूप कमी काळात शिक्षकांच्या गळ्यातले ताईत बनले. शिक्षण क्षेत्रातील विविध प्रकारच्या प्रश्नांना हात घालताना तो प्रश्न मुळापासून समजून घेऊन त्यावर एक तर तोडगा काढायचा किंवा तो मुळासकट उपटून टाकायचा या दोनच गोष्टी संजय चव्हाण यांच्या नेतृत्वाला सातत्याने जाणवत होत्या आणि त्यातूनच कोणत्याही गोष्टीचा तडा लावल्याशिवाय स्वस्थ बसायचं नाही ही भूमिका संजय चव्हाण यांनी नेहमीच घेतली. वक्तृत्व , कर्तुत्व व नेतृत्व यांचा संगम संजय चव्हाण यांच्याकडे होता… याच त्रिवेणी संगमाच्या ताकदीने हा लढवय्या प्रश्नांसाठी लढत गेला आणि अनेकांना भिडत गेला…. यातूनच कसदार नेतृत्व घडत गेलं आणि त्यामुळेच शिक्षकांचा कोणताही प्रश्न असो त्यासाठी नाव समोर यायचं ते म्हणजे संजय चव्हाण सर…. त्यांनी त्यांच्या एकूण नोकरीच्या सेवा काळामध्ये शेकडो शिक्षकांच्या अनेक समस्यांचे निराकरण केले शिक्षणाधिकाऱ्यांशी समन्वयाने प्रश्न सोडवण्याची चर्चा असेल , किंवा शिक्षक संघटनेचे नेतृत्व करत असताना शिक्षकांना न्याय मिळवून देण्याची कणखर भूमिका असेल शिक्षकांच्या कोणत्याही प्रश्नांना योग्य पद्धतीने तडीस घेऊन जाण्यासाठी अभ्यासपूर्ण व प्रसंगी प्रखर भूमिका घेत प्रश्न सोडविण्याचे कौशल्य संजय चव्हाण यांना फार उत्तमपणाने जमलं आणि त्यामुळेच शिक्षकांच्या प्रश्नांना सतत सोडवण्यासाठी शिक्षकांचा ते आवाज बनले.जिल्हाध्यक्ष म्हणून नासिक जिल्हा क्रीडाशिक्षक संघटनेची धुरा सांभाळत असताना क्रीडा शिक्षकांचे अनेक प्रश्न मग ते क्रीडा विविध सामन्यांच्या संदर्भात असतील , विद्यार्थी क्रीडा फी च्या संदर्भात असतील किंवा क्रीडा शिक्षकांचे प्रशिक्षण घेणे संदर्भात असतील या सर्व बाबतीमध्ये त्यांनी लिहिलेले पुढाकार घेऊन क्रीडा शिक्षकांनाही तेवढ्याच ताकतीने न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. शिक्षण क्षेत्राशी नाळ जुळलेले असल्यामुळे प्रश्नांना समजून घेण्याची व त्यांना योग्य पद्धतीने हाताळण्याचं कौशल्य संजय चव्हाण यांना अत्यंत उत्तम जाण असल्यामुळेच त्यांचं नेतृत्व पुढे अधिकाधिक विकसित व शिक्षकप्रिय होत गेलं. आज ३४ वर्षाच्या प्रदिर्घ सेवेनंतर शिक्षक नेते मा.श्री. संजय चव्हाण सर यांच्या सेवानिवृत्ती च्या निमित्ताने त्यांना अजूनही कामाची संधी या शिक्षण क्षेत्रात आहे त्यामुळे त्यांनी या शिक्षण क्षेत्रात अधिक जोमदारपणे शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षण क्षेत्रातले अडचणी सोडवण्यासाठी कार्यरत रहावे अशा प्रकारची शिक्षकांची इच्छा असून त्यांनी त्यासाठी आपल्या सेवानिवृत्ती नंतरच्या पुढील काळात नेतृत्व करावे अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि संजय चव्हाण यांच्या सेवानिवृत्तीसाठी मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद…..!

