नाशिक (प्रतिनिधी): येत्या १७ आणि १८ जानेवारी या कालावधीत गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने पंचवटीच्या मखमलाबाद रोडवरील भावबंधन लॉन्समध्ये संपन्न होणाऱ्या चौथ्या अ.भा.शेकोटी लोककला साहित्य संमेलनाची दुसरी नियोजन बैठक येथील हुतात्मा स्मारकात संपन्न झाली.
ज्येष्ठ साहित्यिक माजी आ.नानासाहेब बोरस्ते, पुंजाजी मालुंजकर, प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर, समन्वयक किरण सोनार, शीतल कुयटे मंचावर उपस्थित होते. संमेलनासाठी गठित विविध समित्यांच्या कामाचा आढावा घेण्यात आला. सुरेश पवार यांनी संमेलनाची रूपरेषा सादर केली. उपस्थितांनी मांडलेल्या विविध सूचनांवर विचारविनिमय करण्यात आला. गत तीन संमेलनांप्रमाणेच चौथे संमेलनदेखील अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. निधी संकलनासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याचे ठरविण्यात आले. ज्येष्ठ साहित्यिक प्र.द.कुलकर्णी, विवेक उगलमुगले, डॉ.संतोष साबळे, सुहास टिपरे, बाळासाहेब सोनवणे, तु.सी.ढिकले, वाळू आहेर, मधुकर गिरी, अलका दराडे, तुषार वाघ, अमोल गणोरे, नारायण पालखेडे, रतन पिंगट, दत्तू दाणी, राजेश जाधव, गणेश पवार, सोमनाथ साखरे, ब्रिजकुमार परिहार, विशाल टर्ले, संजय आहेर, बाळासाहेब गिरी, प्रा.राजेश्वर शेळके, अरुण इंगळे, रामचंद्र शिंदे, प्रशांत कापसे, कविता कासार, सुशीला संकलेचा, प्रा.आशा पाटील, आशा गोवर्धने, माधुरी अमृतकर, राजेंद्र देसले, वैशाली शिंदे, सुजाता येवले, दशरथ झनकर, अशोक कुमावत, पोपटराव देवरे, रविकांत शार्दुल आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. किरण सोनार यांनी आभार मानले.