
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१२६ वा दिवस
हिंदू धर्म हा संघर्ष वा एखाद्या विशिष्ट तत्त्वावर अथवा तत्वप्रणालीवर विश्वास ठेवण्याचा प्रयत्न यावर आधारित नसून, तो अनुभवाच्या प्रचितीवर म्हणजेच साक्षात्कारावर आधारित आहे. विश्वासावर नव्हे तर स्वतःला घडविण्यावर आधारित आहे. विश्वास किंवा श्रद्धा हा धर्माचा पाया असतो तरी पण, अशा बऱ्याच श्रद्धा आहेत की ज्यामुळे त्या धर्माचे अनुयायी असहिष्णु बनतात, आणि म्हणतात की त्यांचाच धर्म तेवढा खरा व सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे ते इतर धर्माचे अस्तित्व नाकारतात. पण जेव्हा साक्षात्कार वा अनुभूती हा धर्माचा पाया असतो, जेव्हा असणे आणि स्वतः घडविणे हा धर्माचाच एक भाग असतो तेव्हा धर्माचा सर्व रोख हृदयातील ईश्वराचे अस्तित्व आणि त्यांच्याशी तादात्म्य साधण्याकडे असतो.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर पौष १ शके १९४७
★ पौष शुध्द /शुक्ल २
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २२ डिसेंबर २०२५
★ नृसिंह सरस्वती जयंती.
★ १८५१ जगातील पहिली रेल्वे मालगाडी रुरकी येथे सुरु करण्यात आली.
★ १८८७ थोर भारतीय गणितीतज्ञ श्रीनिवास रामानुजन यांचा जन्मदिन
★ १९४५ रसाळ लावण्या लिहीणारे लावणीसम्राट श्रीधर कृष्णाजी कुलकर्णी तथा ‘पट्ठे बापूराव’ यांचा स्मृतीदिन
★ राष्ट्रीय गणित दिन…
★ सूर्याच्या उत्तरायणास प्रारंभ.
