
नांदगाव — मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव विद्यालयात शाळा स्तरीय ‘ मॅरेथॉन ‘ स्पर्धेचे अतिशय उत्साही वातावरणात आयोजन करण्यात आले होते.
सकाळी ठिक ८ :०० वाजता मनमाड कडे जाणाऱ्या मार्गावर स्पर्धेला सुरुवात झाली.या स्पर्धेचे उद्घाटन श्री विजय काकळीज ( अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती)यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून व हिरवा झेंडा दाखवून करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ज्योती काळे, उपमुख्याध्यापक दिपक चव्हाण, पर्यवेक्षक अविनाश शेवाळे व शिक्षक वृंद उपस्थित होते.
ही मॅरेथॉन स्पर्धा वयोगटानुसार चार गटांत विभागणी करण्यात आली ‘ धावा आरोग्यासाठी ‘ (Run for Health) ही या स्पर्धेची मुख्य संकल्पना होती. विद्यार्थ्यांनी उद्घाटन ठिकाणापासून सुरुवात करून लहान गट मुली ३ किमी. तर मुले ४ किमी. मोठा गट मुली ४ किमी.तर मुले ५ किमी.चा टप्पा पूर्ण केला.ठिकठिकाणी टाळ्यांच्या कडकडाटात विद्यार्थ्यांचे मनोबल वाढविले.
विजेते..
लहान गट – मुली
१) पूनम ज्ञानेश्वर केसकर
२) भाग्यश्री किसन शिंदे
मुले
१) निखिल दत्तू चव्हाण
२)अंश प्रमोद झाडे
मोठा गट – मुली
१) श्वेता नाना डोळे
२) गायत्री ज्ञानेश्वर केसकर
मुले
१) कृष्णा प्रकाश चव्हाण
२) आदित्य प्रविण अहिरे
प्रमुख पाहुण्यांनी नमूद केले की, “आजच्या धावपळीच्या युगात शरीर सुदृढ ठेवण्यासाठी खेळांची आणि व्यायामाची नितांत गरज आहे”
मविप्र समाज संस्थेचे तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे – पाटील यांनी सर्व स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. मुख्याध्यापिका ज्योती काळे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
ह्या प्रसंगी पोलीस निरीक्षक श्री. दिगंबर भदाणे साहेब व त्यांच्या पोलीस प्रशासनाचे मोलाचे सहकार्य लाभले.
ही स्पर्धा यशस्वी होण्याकरिता क्रीडा शिक्षक प्रशांत पाटील, सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले.
