
ओझर: दि.२० (वार्ताहर)
येथील मविप्र समाजाचे माधवराव बोरस्ते विद्यालयात महाराष्ट्राचे थोर समाज सुधारक संत गाडगेबाबा यांच्या पुण्यतिथी निमित्त प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक सोपान वाटपाडे, उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे ज्येष्ठ शिक्षिका मंगल सावंत सरोज खालकर यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक शिक्षिका सोनल माळोदे यांनी केले. यावेळी सातवी ब च्या निशा आहेर या विद्यार्थिनीने गाडगे महाराज यांच्या जीवन कार्यावर सविस्तर भाषण केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सोपान वाटपाडे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे उपस्थित होते. अध्यक्षीय भाषणात सोपान वाटपाडे यांनी, दगडात देव नाही, तर माणसात देव आहे असे आपल्या प्रबोधनातून सांगणारे, स्वतः हाती झाडू घेऊन गावोगाव स्वच्छता करणारे, महाराष्ट्रात गावोगावी हिंडून अज्ञानी व अडाणी समाजाला स्वच्छतेचा संदेश देणारे संत गाडगेबाबांचे कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे उपस्थितांना सांगितले. फलक रेखाटन कला शिक्षिका सविता पवार यांनी केले. सूत्रसंचालन नचिकेत घोलप सातवी ब या विद्यार्थ्याने केले.
