
आजच्या अहमदाबादच्या शेवटच्या सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना जवळपास सर्वच भारतीय फलंदाजांनी तडाखेबंद फलंदाजी करून २३१/५बाद असा धावांचा डोंगर उभारला!
सलामीवीर अभिषेक (२१चेंडूत ३४,६चौके,१ छक्के) आणि सैमसनने (२२चेंडूत ३७ धावा,४चौके ,२ छक्के) धुवांधार फलंदाजी करून ६३ धावांची भागीदारी करत मजबूत पाया रचला!
नंतर तिलक वर्मा (४२ चेंडूत ७३धावा,१०चौके,१ छक्का)आणि हार्दिक पंड्याने शतकी भागीदारी करून (२५,चेंडूत ६३,५चौके ५ छक्के)त्यावर कळस चढवला!
तिलक वर्माने नेहमी प्रमाणे जबाबदारीने खेळून कसलेही जिवदान न घेता चौफेर फटकेबाजी केली, आणि सामनावीर हार्दिकने तर पैव्हिलियन मधून सेट होऊन आल्यासारखा प्रत्येक चेंडू वर चौकार षटकारांची बरसात करताना ताकद, टायमिंग,जोष दाखवून संघाची धावसंख्या दोनशे पार धावा करण्यायोग्य स्टाईक रेट ठेवून प्रेक्षणीय फलंदाजी करून घरच्या मैदानावर क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध केले!
नंतर गोलंदाजी करताना एक महत्त्वाचा विकेटही मिळवून अष्टपैलू खेळ केला!
परिणामी भारतास २३२ हे अशक्यप्राय उद्दिष्ट आफ्रिकेसमोर ठेवता आले!
तरीही नंतर फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेच्या सलामीवीर डीकाकने पुन्हा एकाकी झुंज दिली, त्याला हेंड्रिक्सने चांगली साथ दिली होती, त्यामुळे अकराव्या षटकात १२०/१बाद अशा जिंकण्यायोग्य स्थितीत असणार्या आफ्रिकन संघाचे नंतर मालिकावीर वरुण चक्रवर्तीच्या गूढ, जिगरबाज गोलंदाजीने आफ्रिकेच्या फलंदाजीस खिंडार पाडले, आणि तब्बल चार विकेट काढून एक चांगला विजय मिळवून गोलंदाजीचा मुख्य भार वाहिला!
आणि बुमराने २ विकेट्स काढून घातक सलामीवीर डीकाकचा मोठा अडसर दूर केला! आणि चक्रवर्तीस साथ दिली!
तरीही तळाच्या आफ्रिकन फलंदाजांनी झुंज देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांची धावसंख्या शेवटी २०१वर धावसंख्या सिमीत राहिली! कारण शेवटी सर्वच भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करून ३० धावांनी एक सुरक्षित विजयाने ३-१ असा मालिका विजय मिळवून पुढच्या महिन्यातील येणार्या विश्व चषकात भारतीय संघाचे मनोधैर्य वाढवले!
:-वासु व्हटकर
९०८२२२४११८,
९३२५३१७७०२
