
सिन्नर (प्रतिनिधी)२० डिसेंबर २०२५ राष्ट्रसंत गाडगे बाबा यांच्या ६९ व्या स्मृतीदिनानिमित्त महामित्र परिवार व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेडच्या वतीने सिन्नर येथे त्यांना अभिवादन करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवराय यांच्या पुतळ्यास व संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष महामिञ दत्ता वायचळे साहेब होते या प्रसंगी ते म्हणाले की राष्ट्रसंत गाडगे बाबा हे समाज सुधारक होते.त्यांनी “तिर्थी धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी” म्हणत तिर्थक्षेञी देवळात दगड-गोट्यात देव न शोधता माणसात सजीवात देव शोधला. भुकेलेल्याला जेवण द्यावे,तहानलेल्याला पाणी पाजावे.देव याच्यात राहतो असे ते म्हणत.रोगराई मुळे अनेक माणसं मरत होती.गाडगे बाबांनी रोगराई का होते याचं कारण अस्वच्छता मुळे म्हणुन त्यांनी हातात झाडू घेऊन स्वत: गावोगाव झाडू मारून संध्याकाळी आपल्या किर्तनाच्या माध्यमातून लोकांमध्ये प्रबोधन करायचे.गाडगे बाबांनी अखंड मानवजाती साठी काम केलं. देवळे बांधुन पुजा-याचे पोट भरण्यापेक्षा ज्ञानमंदिर बांधा समाजाला त्याचा फायदा होईल.गाडगे बाबांनी देवळात न जाता समाज प्रबोधन केले.आंधश्रध्दा निर्मुलन, जातीभेद नष्ट व्हावा व सर्व समाज एक विचाराचा बनला पाहिजे या साठी त्यांनी काम केलं संत महात्मा,क्रांतिकारक,महापुरूष समाजसुधारक आपले आदर्श असून त्यांचे विचार आणि कार्य आपण पुढे नेले पाहिजे.अशा समाज सुधारकास विनम्र अभिवादन!
या कार्यक्रमाचे सुञसंचलन दशरथ देसाई व बंडू जाधव यांनी केले.व प्रास्थाविक विजय मुठे यांनी केले.तर आभार अरुण निकम यांनी मानले.
या कार्यक्रमाला उपस्थित महामित्र दत्ता वायचळे साहेब, आद्यक्रांतीकारक राघोजी ब्रिगेडचे सहसंस्थापक विजय मुठे,दत्ताभाऊ जाधव, दशरथ देसाई, अरुण निकम,बंडू जाधव, राम उगले प्रकाश माळी,मनोज माळी विजय गवळी,धनंजय परदेश, रितेश जाधव विजय सुरवे,गणपत काळे, राजेंद्र सातपुते, राजेंद्र देशमुख,पांडूरंग चोकोर गोपीनाथ वाजे,नामदेव कुटे,अशोक भागवत, सोमनाथ लोहारकर, अंबादास भालेराव उपस्थित होते.
