
दिनांक 20 डिसेंबर 2025
सिन्नर महिला मंडळ सिन्नर संचलित मातोश्री सगुनाबाई भिकूसा प्राथमिक शाळेत
संत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माझी नायब तहसीलदार श्री दत्ता वायचळे उपस्थित होते तसेच संत गाडगे महाराज परीट गल्ली मंडळाचे सदस्य श्री अरुण निकम श्री बंडू जाधव व श्री दशरथ देसाई हे देखील यावेळी उपस्थित होते.यावेळी विद्यार्थ्यांनी संत गाडगे महाराज यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले .संत गाडगे महाराज यांच्या कार्याला यावेळी उजळा देण्यात आला .संत गाडगे महाराजांचे विचार तसेच यातून झालेले सामाजिक बदल व त्यांच्या कार्याचा वसा याविषयी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सिन्नरचे माजी नायब तहसीलदार श्री दत्ता वायचळे यांनी गाडगे महाराजांविषयी मनोगत व्यक्त करून त्यांचे गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला हे भजन म्हणून कार्यक्रमाला अधिक शोभा आणली. संतांचे विचार त्यांनी आपल्या भाषणातून प्रगट केले.श्री दशरथ देसाई यांनी यावेळी ज्या विद्यार्थ्यांनी भाषण केले त्यांना वहि वाटप केले,त्यामुळे विद्यार्थी अधिक आनंदी झाले. यावेळी मातोश्री सगुनाबाई भिकुसा प्राथमिक शाळेस संत गाडगे महाराज मित्र मंडळ यांचे कडून एक हजार रुपये देणगी देण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता पाटोळे मॅडम यांनी संत गाडगे महाराजांविषयी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले तसेच शाळेच्या उपशिक्षिका अहिरे मॅडम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले यावेळी शिक्षक पालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी कार्यक्रमास उपस्थित होते.
