
‘विद्यार्थी व पालकांचा उत्स्पूर्त प्रतिसाद’
मांडवड (प्रतिनिधी)
मराठा विद्या प्रसारक समाजाचे होरायझन अकॅडमी नांदगाव शाळेत संस्थेचे नांदगाव तालुका संचालक इंजि.अमित बोरसे पाटील यांच्या संकल्पनेने आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात विद्यार्थ्यांनी व पालकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन विजय काकळीज सर यांच्या हस्ते झाले. या वेळी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य ठाकरे सर , शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. गणेश चव्हाण, आशिष लोढा,राजेश पाटील,ओ.पी.डी.च्या डॉ.पगार,धनराज काकळीज सर, राठोड सर,सह मान्यवर उपस्थित होते. शाळेचे प्रांगण रंगी बेरंगी सजावटीचे आणि आनंदी वातावरणाने भरून गेले होते. आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल, खेळ हस्तकला वस्तू आणि मनोरंजनाचे उपक्रम सादर केले .प्रत्येक स्टॉल वर विद्यार्थ्याची सर्जनशीलता व मेहनत दिसून येत होती. पालक शिक्षकाने पाहुण्यांनी उपक्रमाचे भरभरून कौतुक केले या मेळाव्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास संघभावना तसेच व्यवहार ज्ञान विकसित होण्यास मदत झाली.
शाळेच्या प्राचार्या. श्रीमती पुनम डी.मढे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम संपन्न झाला त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाचे नियोजन शालेय शिक्षिका स्वप्ना जाधव व अश्विनी उगले यांनी केले. कार्यक्रमासाठी शालेय शिक्षक, शिक्षिका,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
