
लासलगाव, ता. २० ( प्रतिनिधी) येथील नूतन विद्या प्रसारक मंडळ संचलित कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (+२ स्तर) विभागाच्या वतीने संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, रा.से.यो. कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व प्राध्यापक यांच्या हस्ते “देव दगडात नसून माणसात आहे” असे सांगणारे संत गाडगे महाराज यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमा पूजनाने करण्यात आली. संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व्यासपीठावरील उपस्थित सर्व प्राध्यापकांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संस्थेचे जनरल सेक्रेटरी श्री.गोविंदराव होळकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आदिनाथ मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा.देवेंद्र भांडे, प्रा.सुनिल गायकर आणि रासेयो स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. यावेळी उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
