
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१२५ वा दिवस
मनुष्याचा आत्मा अनादी, अमर व पूर्ण आहे आणि एका देहातून दुसऱ्या देहात जाण्याचे नावच मृत्यू होय. आपली वर्तमान अवस्था आपल्या गत कर्माचे फल असून भावी अवस्था वर्तमान कर्मांचे फल होय. आत्मा कधी प्रगत तर कधी दुर्गत होत, जन्म आणि मृत्यूच्या अखंड फेऱ्यात अविराम भ्रमत असतो. परंतु येथे आणखी एक प्रश्न उभा राहतो तो हा की, प्रचंड तुफानात सापडलेली छोटीशी नाव जशी एखादा फेसाळ लाटेच्या उंच शिरावर आरुढ होते आणि दुसऱ्या क्षणी दोन लाटांमधील आ वासून बसलेल्या खोल खाईत बेगुमान झुगारली जाते, तसा मनुष्य काय शुभाशुभ कर्माच्या पुरेपूर हवाली असून एकसारखा कधी उन्नत तर कधी अवनत होतो आहे? मनुष्य काय सतत फोफावणाऱ्या उद्दाम कार्यकारण प्रवाहात असहाय अवस्थेत सारखा इतस्ततः फेकला जात आहे.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २९ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष अमावस्या
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. २० डिसेंबर २०२५
★ १९५६ ग्राम स्वच्छतेचे प्रवर्तक श्री. देबूजी झिंगराजी जानोरकर उर्फ गाडगे महाराज यांची पुण्यतिथी.
★ आंतरराष्ट्रीय मानवी एकता दिन.
