
जळगाव निंबायती (वार्ताहर) येथील अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गोविंदराव यशवंतराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या खेळाडूंनी तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत चमकदार कामगिरी केली.
कंदाने येथे झालेल्या तालुकास्तरीय १७ व १९ वर्षे वयोगटातील शुभम चषक कबड्डी स्पर्धेत पाटील विद्यालयाच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कबड्डी स्पर्धेत तालुक्यात तिसरा क्रमांक पटकावला. यशस्वी खेळाडूंना क्रीडा शिक्षक ललित निकम यांनी मार्गदर्शन केले. या यशाबद्दल संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती कासूताई पाटील, सचिव महेंद्र पाटील, समन्वयक निंबाजी शिंदे, सर्व संचालक, पदाधिकारी, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह ग्रामस्थांनी सर्व खेळाडू व क्रीडा शिक्षक यांचे अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात.

