
नासिक जिल्हा प्रतिनिधी- नवनाथ पाटिल गायकर यांजकडुन-
नव्वदीच्या दशकात उदय झालेला व गेली तीन दशके सिन्नर व नाशिकच्या राजकारणात प्रखर तेजाने तळपणारे माणिक आता चहुबाजुनीं घेरल्याचे दिसुन येत आहे.
राज्याचे कृषीमंत्री पदावरुन पदावनवती झालेले क्रीडामंत्री ना. माणिकराव कोकाटेनां अखेर न्यायालयीन आदेशाने मंत्रीपदही सोडावे लागले आहे व आता अटकेची पण भीती आहे.अटक झाल्यास कदाचित आमदारकी ही अपात्र ठरुन त्यांची राजकिय कारकिर्दच धोक्यात येणार आहे.
माणिकराव कोकाटे म्हंणजे आक्रमक राजकारणी. कोकाटे आणि वाद यांच जणु जन्मोजन्मीचं नातं. बोलण्यात स्पष्टवक्तेपणा असल्याने समोर कुणीही मातब्बर असो त्याला हिसका दाखवण्यात कोकाटे माहिर.
सिन्नरच्या राजकारणात प्रसंगी उमेदवारी पळवापळवी असो कि मोठया दिग्गजानां भिडणे असो, कोकाटे कधी मागे हटले नाही.
कै.तुकाराम दिघोळेचें राजकारण संपवताना याच आक्रमकतेच्या बळावर ते तब्बल पाच वेळा सिन्नरचे आमदार झाले.
कॉंग्रेसमध्ये असतानां कै.गुळवे शीं झालेला वाद, गडाख, दिघोळे वाद यानंतर नारायण राणे सोबत शिवसेना सोडणे, भुजबळानां पाडण्याचे धाडस करणे, अजित पवारासोबतीने भाजपचे संगतीत जाणे अशा किती तरी वाद, घटना यांनी माणिकरावाचें राजकारण धगधगते राहिले आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना सिन्नर येथील जाहिर कार्यक्रमात तुमची परत मुख्यमंत्री व्हालच याची खात्री नाही, पण मी मात्र सिन्नरचा परत आमदार होईल असे जाहिरपणे बोलण्याचे धाडस माणिकराव यांनी केले होते.अर्थात त्यानंतर माणिकराव पडले हा भाग वेगळा.
नशिबाने यावेळी त्यांना राज्याच्या राजकारणात ना.अजित पवार यांनी फार मोठी संधी दिली होती. कृषी सारखं मातब्बर मंत्रीपद त्यांना मिळालं होतं.पण पदाचे माध्यमातुन माय बाप अन्नदात्याचे जीवन सुखी करुन आशिर्वाद घेण्याऐवजी आपल्या बेताल वक्तव्याने बळीराजाच्या नापसंतीस ते उतरलेच शिवाय फडणवीस सरकारची ही प्रतिमा यामुळे मलिन होऊ लागली.
दोन चारदा माफी देऊनही शहाणे न झालेल्या कोकाटेनीं एका प्रसंगी तर चक्क मुख्यमंत्र्यानांही शिंगावर घेतले.
रमी खेळाने तर नाचक्कीच केली.पण गच्छंती ऐवजी पदावनवती झाली.
आणि अखेर सदनिका प्रकरणी तर राजीनामाच दयावा लागला.
राजकारणात आक्रमकपणा नेहमीच यश नव्हे तर घात ही करतो.संयम खुप महत्त्वाचा असतो.वाणीला लगाम तर अत्यावश्यक असावा लागतो.
आता पुढे ककाटेचं काय ? हा मोठाच प्रश्न उभा ठाकणार आहे. सिन्नरला नव्या नेतृत्वाची गरज या निमित्ताने अधोरेखित झाली असुन ही पोकळी कोण भरुन काढेल हे येणारा काळच सांगेल.
