
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१२४ वा दिवस
भारतात अनेकेश्वरवाद नाही. कोणत्याही देवालयात एका बाजूला उभे राहून जर कुणी श्रवण करील तर त्याला ऐकू येईल की पूजक देवमूर्तीवर ईश्वराच्या समग्र गुणांचा फार काय पण सर्वव्यापित्वाचा देखील आरोप करीत आहे. ह्याला अनेकेश्वरवाद अथवा कुण्या विशिष्ट देवाचा प्राधान्यवाद प्रभृती कोणता एखादा वाद म्हणूनही चालणार नाही. गुलाबाला हवे ते नाव द्या, त्याने त्याच्या सुवासाची काहीच हानी होणार नाही आणि केवळ एखादे नाव दिल्यानेच वस्तूच्या स्वरूपाचे यथार्थ स्पष्टीकरण होते असेही नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २८ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष अमावस्या
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. १९ डिसेंबर २०२५
★ १८९९ मानवाधिकारासाठी अजीवन संघर्ष करणारे अमेरिकन नेते मार्टिन ल्युथर किंग यांचा जन्मदिन.
★ १९३४ भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा जन्मदिन.
★ गोवा मुक्ती दिन. (पोर्तुगीजांच्या ताब्यातील गोवा, दीव दमण हे प्रांत १९६१ मध्ये भारतात समाविष्ट झाले.)
