
दहिवड येथे झालेल्या देवळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रथम क्रमांक मिळवून जिल्हास्तरावर निवड झालेल्या जनता विद्यालय, लोहोणेरच्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन अभिनंदन करताना डॉ. मच्छिंद्र कदम, विनीत पवार,एस.के.सावंत,राजेंद्र कापडणीस,समवेत सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक. (छाया : सुनिल एखंडे)
दिव्यांग व माध्यमिक गटात प्रथम, तर प्राथमिक गटात तृतीय क्रमांक मिळवुन जिल्हास्तरावर झेप
लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयाच्या बाल वैज्ञानिकांनी के.एल.डी.विद्यालय, दहिवड येथे पार पडलेल्या २२व्या देवळा तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात उल्लेखनीय कामगिरी करत तिहेरी यश संपादित करत जिल्हास्तरावर झेप घेतली.या प्रदर्शनात दिव्यांग गटात विद्यार्थी विराट सूर्यवंशी व वरद पगार यांनी सादर केलेल्या “दा विंची ब्रिज” या अभिनव प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला. माध्यमिक गटात कपिल जाधव व तेजस आहेर यांच्या “विठ्ठल ए.आय.” या आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित प्रतिकृतीने प्रथम क्रमांक मिळवून उपस्थितांची मने जिंकली. तर प्राथमिक गटात अर्जुन सूर्यवंशी व अर्जुन देवरे यांनी सादर केलेल्या “कचरा एक संपत्ती” या उपयुक्त संकल्पनेवर आधारित प्रतिकृतीला तृतीय क्रमांक प्राप्त झाला.प्रथम क्रमांकाचे बक्षीस शिक्षणाधिकारी डॉ.मच्छिंद्र कदम, गटशिक्षणाधिकारी सतीश बच्छाव व जिल्हा विज्ञान अध्यापक संघ अध्यक्ष विनीत पवार,मुख्याध्यापक संघ अध्यक्ष एस. के. सावंत,राजेंद्र कापडणीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.या यशाबद्दल मविप्र देवळा तालुका संचालक विजय पगार, माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष भैय्यासाहेब देशमुख,उच्च माध्यमिक शालेय समिती अध्यक्ष नितीन आहेर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश आहिरे, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष दिपक देशमुख, माता-पालक संघ उपाध्यक्ष सविता देशमुख यांच्यासह सर्व पदाधिकारी, सदस्य व पालकांसह मुख्याध्यापिका के.ए.शिंदे, उपमुख्याध्यापक एन.आर.ठाकरे, पर्यवेक्षक व्ही.एम.निकम आदींनी अभिनंदन करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.या घवघवीत यशासाठी विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक सचिन रौंदळ, संजय अहिरे, दौलत पवार, अनिल शेवाळे, अनिता पाटील, ज्योती पाटील, माधुरी भामरे, गायत्री आहेर, स्वाती भामरे, पल्लवी पवार आदींसह सर्व शिक्षकांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
