
हिसवळ बु. ( चिंतामण सदगीर ) – येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन श्री.बाळासाहेब करवर यांनी सुरु केलेल्या “रामकृष्ण “गोशाळेची नुकतीच महाराष्ट्र शासनाच्या अनुदानासाठी “लाभार्थी “म्हणून निवड झालेली आहे. महाराष्ट्र शासनाने नुकताच गोशाळेत ठेवलेल्या देशी गाईच्या पालन पोषण करण्यासाठी अनुदान देण्याचा निर्णय घेतलेला आहे. या योजनेत हिसवळ बु येथील गोरक्षक श्री. बाळासाहेब करवर यांनी सन 2022 मध्ये केवळ 7 गाईच्या गोधन पालनातून सुरु केलेल्या “रामकृष्ण”गोशाळेने नुकताच शासनाच्या अनुदानासाठी लाभार्थी म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे सतत दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नांदगाव सारख्या “दुष्काळी “भागात स्वखर्चाने गोशाळा सुरु करून आज श्री. बाळासाहेब करवर यांनी आज केवळ 7 गायी पासून सुरु केलेल्या गोधनाची आजची संख्या 80 एवढी करून आपल्या या सत्कर्मातुन “रामकृष्ण गोशाळे”सह स्वतःच्या हिसवळ बुद्रुक या जन्मगावाची अर्थात आपल्या जन्मभूमीची नाशिक जिल्ह्यात उत्तुंग गगन भरारी घेऊन सैनिकांचे गाव म्हणून ओळख असलेल्या हिसवळ गावाची एक “गोपालक गाव अशी एक नवीन “आगळीवेगळी “ओळख निर्माण करून दिली आहे बाळासाहेब करवर यांच्या या कामगिरीबद्दल त्यांचे गुरुवर्य महामंडळेश्वर 1008 श्री श्री मुक्तानंदजी गिरी महाराज यांचेसह मनमाड येथील श्री. देवराम सदगीर साहेब सिन्नर येथील डॉ. टी. के. सदगीर खिर्डी येथील हभप श्री. निवृत्ती महाराज यांचेसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्हाट्सअँप – फोनवर शुभेच्छा देऊन तसेच प्रत्यक्ष भेटी देऊन अभिनंदन करून त्यांच्या या कार्यासाठी सदिच्छा दिलेल्या आहेत.

