
नांदगाव, दि.28 (मुक्ताराम बागुल):- नासिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यात असलेल्या घाटमाथ्यावरील पूर्व भागातील बोलठाण येथील नांदगाव तालुक्याचे माजी आमदार कन्हैयालाल नहार यांचा जन्मशताब्दी महोत्सव बोलठाण येथील श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज येथे साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोलठाण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष राजेंद्र नहार हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वर्गीय कांताबाई भवरीलाल जैन कॉलेज ऑफ इंजीनियरिंगचे संचालक आर.जी. तातेड, हभप पुरुषोत्तम महाराज, सेवानिवृत्त प्राचार्य सच्चिदानंद भट, सचिव सुरेंद्र नहटा, लोकनेते कन्हैयालाल जी नहार पतसंस्था मर्यादित चे चेअरमन अमित नहार, बोलठाण एज्युकेशन सोसायटी संचालक महावीर नहाटा आदी प्रमुख उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य विजयकुमार शेलार यांनी केले व आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून स्वर्गीय लोकनेते नांदगाव तालुक्याचे माजी आमदार कन्हैयालालजी नहार यांच्या विकास कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली. माजी आमदारह कन्हैयालाल नहार यांनी बोलठाण सह बोलठाण परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी म्हणून श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज ही संस्था उभारून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची शिक्षणाची होणारी परवड थांबवली.

यासह संपूर्ण परिसराच्या विकासासाठी काम केले आहे. याप्रसंगी राजेंद्र नहार, सुरेंद्र नहाटा, बोलठाण ग्रामपंचायतचे सरपंच वाल्मीक गायकवाड, माजी सरपंच कांताबाई नहार, सुभाष नहार, नेहा बोरा, प्रेक्षा नहार आदी उपस्थित होते.
