
मनमाड -: येथील मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या आदर्श इंग्लिश मेडीयम स्कूल मनमाड येथील विद्यार्थ्यांनी मनमाड जवळील द्त्ताचे शिंगवे येथील निसर्गसौंदर्य परिसरात वनभोजनाचा मुक्तपणे आनंद लुटला. प्रथमता थोड्याशा उंच डोंगरावर असलेल्या दत्ता देवाचे दर्शन घेऊन तेथील प्रसन्न परिसरात वि. गाणी,गोष्टी , नाटक, नृत्य व अनेक प्रकारचे मैदानी खेळ रंगले. तेथील वि. झाडा-झुडपांचे ,आसपास असलेल्या शेतात असलेलीं पिकांची लागवड,वाढ यांचा देखील अभ्यास विद्यार्थ्यांनी केला. विद्यार्थ्यांनी वनभोजनाचा पुरेपूर आनंद लुटला. दमल्यानंतर सर्वांनी एकञीत आपली आणलेली शिदोरी /जेवण केले. तेथील स्वच्छता करुन विद्यार्थी आपल्या शाळेत पुन्हा परतले.

अशा प्रकारे अनेक ऐतिहासिक ठिकाणी, निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या ठिकाणी पुन्हा भेट देऊया असे शाळेच्या मुख्याध्यापिका शितल आहेर यांनी विद्यार्थ्यांना ग्वाही दिली. वनभोजन पिकनिक यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.
