
मनमाड (प्रतिनिधी) मनमाड शहरातील कामगार चळवळीतील तसेच सत्यशोधक आणि अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीतील ज्येष्ठ मार्गदर्शक कॉम्रेड रामदास पगारे यांचे वयाच्या 72 व्या वर्षी निधन झाले अंधश्रद्धा निर्मूलन चळवळील त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही खंबीरपणे कार्य करीत असताना महात्मा फुले छत्रपती शाहू आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक वसाची जवळपासना केली. अंधश्रद्धा निर्मूलन बरोबरच त्यांनी मंडळ आयोग तथा ओबीसींच्या हक्काचा जागर कायम ठेवत ठेवला होता त्यासाठी सांस्कृतिक क्षेत्रातील कलापथक लोकनाट्यद्वारे समाज प्रबोधन गेली 45 वर्ष त्यांनी केले उत्तर महाराष्ट्रातील पहिली ओबीसी हक्क परिषद मनमाडला आयोजित करण्यात श्री पगारे यांचा सिंहाचा वाटा होता रामदास पगारे यांच्या निधनाने सत्यशोधक आणि परिवर्तनवादी चळवळीची अपरिमित हानी झाली आहे मनमाड बचाव कृती समिती सत्यशोधक मंच अंधश्रद्धा निर्मूलन समिती.
