
ओझर: दि.१७ वार्ताहर
माधवराव बोरस्ते विद्यालयात शाळा स्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक सोपान वाटपाडे यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी विद्यार्थ्यांना नवनवीन प्रयोग व शोध कसे लावावे याविषयी माहिती दिली. विद्यार्थ्यांनी विज्ञानावर आधारित रांगोळी काढली. याप्रसंगी उपमुख्याध्यापक सतीश केदार पर्यवेक्षक दशरथ शिंदे महेंद्र डांगळे आत्माराम शिंदे प्रभाकर लवांड हेमंत भट शिक्षिका मंगल सावंत संगीता शेटे सरोज खालकर आदी शिक्षक उपस्थित होते

प्रदर्शन यशस्वीतेसाठी बाबासाहेब गायकवाड नरेंद्र डेरले उज्वला कदम भंडारे एस ए, चौधरी एम व्ही, मोहन आर पी, शिंदे व्ही बी, श्रीम.कावळे एन एस, श्रीम.माळोदे एस एस आदींनी परिश्रम घेतले. पाचवी ते दहावीच्या बहुसंख्य विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवला. समिती प्रमुख अर्चना घुमरे यांनी विज्ञान प्रदर्शनाचे नियोजन केले. फलक लेखन कलाशिक्षिका सविता पवार मोनाली निकम मोहन क्षीरसागर यांनी केले. आभार शिक्षिका कीर्ती बच्छाव यांनी मानले.
