
नाशिक (प्रतिनिधी)दि न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट,नाशिक संचलित यशोदामाता डायाभाई बिटको गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज,नाशिक.या शाळेत आज मंगळवार दि.१६/१२/२०२५ रोजी शारदोत्सव साजरा करण्यात आला.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थिनी मंजिरी मोहबंसी व लोकशाहिर स्वप्निल डुंबरे या मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व ईशपूजन करुन सरस्वतीचे पूजन करण्यात आले.विद्यार्थिंनीनी ईशस्तवन सादर केले.त्यांना मार्गदर्शन ऋतुजा नाशिककर यांनी केले.शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले.प्रमुख पाहुणे मंजिरी मोहबंसी यांचा परिचय कु.गायत्री गांगुर्डे १२-क व मा.श्री स्वप्निल डुंबरे सर यांचा परिचय कु.माही खैरनार १०-अ यांनीे केले.यावेळी प्रमुख पाहुण्यांचा व उपस्थित सर्व मान्यवरांचे सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे यांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थिनी मंजिरी मोहबंसी यांनी आपल्या विचारातून शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देत अन् कित्येक वर्षानंतर मागे वळून बघतांना मला या शाळेने जे ज्ञान,शिस्त व संस्काराची शिदोरी दिली.त्यातून माझ्या आयुष्यात एका चांगल्या जीवनाचा वर्तूळाचा वलय निर्माण झाला.
पुढे तिने *”तू करु शकतेस”* या एका वाक्याने जणू जग जिंकू शकतो,यातून माझ्या जीवनात खूपच बदल झाला.जी मज्जा असते,ती फक्त शाळेतच असते.या शाळेने आम्हाला बोलायला शिकविले.चूल व मूल सांभाळून अन् जबाबदारीचे ओझे पेलत स्वप्न बघून करिअर कसे घडवायचे यांचे उत्तम माहिती अनुभवातून सांगितली.आणि जे करायचे ते ठामपणे करावे.स्वप्नातून घे भरारी यातून प्रत्येकामध्ये आत्मविश्वास निर्माण झाले पाहिजे.पुढे आपल्या आजुबाजूला नेहमीच चांगल्या व वाईट गोष्टी घडत असतात.त्यातून फक्त चांगल्याच गोष्टीचा विचार करणे आज खरी काळाची गरज आहे.सोशल मीडिया,मोबाईल यांचा योग्य वापर करून चांगल्या गोष्टीवर भर द्या.आणि नेहमीच ज्ञान व शिक्षणाकडे लक्ष दिले तर पैसा नक्कीच मिळेल.शेवटी भावूक होऊन या शाळेने मला जगायला शिकविले.अन् पुढील स्पर्धेसाठी सर्वांना शुभेच्छा दिल्या.

महाराष्ट्र युवा लोकशाहिर मा.श्री स्वप्निल डुंबरे यांनी पोवाड्यातून महाराष्ट्र, महापुरुषांच्या कार्याचा गौरव,महानमाता व थोर आदर्श विचारवंताचे विचारांची प्रेरणा घेत *”मला जिजाऊ,सावित्री,रमाई तुमच्यामध्ये दिसावी”* व *”माझी मैना गावाकडे राहिली,माझ्या जीवाची होतेय दैना”* अशा महान माता व थोर महापुरुषांच्या इतिहासाचा सुंदर असे दर्शन पोवाड्यातून घडविले.
त्याबरोबरच विद्यार्थिनींनी सुंदर असे नृत्य सादर केले.तसेच आदिवासीची संस्कृती जोपासणारी विद्यार्थिनींनी तारपा नृत्य,पावरी नृत्य,ठाकर नृत्य सुंदरतेने सादरीकरण केले.त्यात पावरीवादन शिक्षक चंदर बोरसे यांनी केले.
त्यानंतर आरती खळदकर (अन्नपूर्णा ग्रुप) यांच्या मार्गदर्शनाखाली विविध मंगळागौरीचे विविध पारंपरिक खेळ विविध पद्धतीने घेण्यात आले.त्यात शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे व सर्व शालेय उपशिक्षिका यांनी अन्नपूर्णा ग्रुपमध्ये सहभागी होऊन विविध मंगळागौरीच्या खेळाचा आनंद घेतला.शेवटी भारत मातेचा जय घोष करण्यात आले.
शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे,उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी व मिलिंद कोठावदे यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षिका सुषमा गवारे व दिपाली ठाकूर यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले.या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.सूत्रसंचालन कु.ज्ञानेश्वरी बोराडे १२-क व कु.अक्षरा गायकवाड १०-अ यांनी तर आभार कु.प्रेरणा पाटील ९-ब हिने केले.फलकलेखन सायली मुळे केले.

या कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष प्रकाश वैशंपायन,उपाध्यक्ष प्रभाकर कुलकर्णी,सेक्रेटरी हेमंत बरकले,असि.सेक्रेटरी सरला तायडे,शालेय समिती चेअरमन रमेश महाशब्दे यांचे मार्गदर्शन लाभले.शाळेच्या मुख्याध्यापिका सविता कुशारे,अधिक्षिका मीना वाळूंजे,उपमुख्याध्यापक राजेंद्र सोमवंशी,ज्युनिअर कॉलेजचे उपमुख्याध्यापक मिलिंद कोठावदे,पर्यवेक्षिका सुषमा गवारे,गव्हर्निग कौन्सिल सदस्य कैलास बागुल,भारती चंद्रात्रे,माजी शिक्षिका अमिता भट,नयना कळमकर,निशा जाधव,सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थिंनी उपस्थित होते.
