
नांदगाव (प्रतिनिधी ) नाशिक शिक्षण प्रसारक मंडळ आयोजित जेष्ठ रंगकर्मी कै.वा.श्री. पुरोहित यांच्या स्मरणार्थ या एकांकिका स्पर्धेचे आयोजन केले जाते हे या स्पर्धेचे ४६ वे वर्षे होते . अशा प्रकारच्या नाट्य स्पर्धा घेणारी महाराष्ट्र राज्यातील एकमेव संस्था ठरली आहे.विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा व बालवयातच या स्पर्धेच्या माध्यमातून अभिनयाचे धडे मिळावे हा खरा स्पर्धेचा हेतू आहे. ह्या स्पर्धेचे उद्घाटन मोठ्या उत्साहाने व्ही.जे.हायस्कूल,नांदगाव येथे उत्सहात संपन्न झाले या स्पर्धेचे उद्घाटन प्रसंगी अध्यक्ष स्थानी नांदगाव संकूलप्रमुख श्री. संजीव धामणे व प्रमुख पाहुणे अभिनेते व निर्माते शाळेचे माजी विद्यार्थी योगेश निकम होते.ह्यावेळी मंचावर सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला , सहखजिनदार हेमंत देशपांडे ,स्पर्धा प्रमुख राहुल मुळे,राजेंद्र पांडे, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे परीक्षक राजेश आहेर ,गणेश शिंदे अर्चना नाटकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुरवातीला कै.वा.श्री. पुरोहित व नटराजाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सेक्रेटरी अश्विनीकुमार येवला यांनी केले. ह्या स्पर्धेविषयी माहिती दिली व १९७७ पासून संस्थेत सुरु केलेल्या एकांकीका स्पर्धा , पर्यावरणपूरक शाडू माती गणपती स्पर्धा, क्रीडा स्पर्धा, विवीध उपक्रम आदींचा गौरवशाली इतिहास व ह्यासोबतच शाळा-शाळांतून संस्कारक्षम पिढी घडविणे हे संस्थेचे प्रमुख ध्येय असल्याचेही सांगितले.

कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी, पाहुण्यांनी आपल्या मनोगतात शालेय तथा महाविद्यालयीन जीवनांतील आठवणींना उजाळा देत नाट्यविश्वातील स्वतःच्या आजवरच्या सर्व यशाचे श्रेय संस्थेच्या कै. वा.श्री. पूरोहीत एकांकीका स्पर्धेला देतांना ते शालेय जीवनातील आपल्या गुरुंविषयी आदर तथा संस्थेविषयी कृतज्ञता व्यक्त करायलाही ह्यावेळी विसरले नाहीत..; ह्यांतूनच त्यांनी वडील कै. मधुकर निकम ह्यांच्या स्मरणार्थ रु.११,०००/- देणगी संस्थेसाठी देत असल्याचे जाहीरही केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष संजीव धामणे ह्यांनी प्रथमच नांदगाव संकूलाला संस्थास्तरावरील कै. पुरोहीत नाट्य स्पर्धेच्या उद्घाटनाचा मान दिल्याबद्दल आपल्या अध्यक्षीय मनोगतातून ह्यावेळी संस्थेला धन्यवाद दिले.व या स्पर्धेतून विद्यार्थांना त्यांच्या अभिनय कलेला चांगली संधी मिळते अशा विविध उपक्रमाचे कौतुक केले.

शेवटी उपस्थित मान्यवर व योगेश निकम ह्यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढवून संस्थास्तरावरील ४६ व्या एकांकीका स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली झोडगेकर ह्यांनी केले व पाहुण्याचा परिचय राहुल मुळे यांनी करून दिला व आभार मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे यांनी मानले.
ह्या उद्घाटन समारंभ व स्पर्धा यशस्वितेसाठी संकूल प्रमुख संजीव धामणे, मुख्याध्यापक लक्ष्मीकांत ठाकरे, उपमुख्याध्यापक.डॉ. नांदुरकर, नांदगाव संकूलाचे स्पर्धाप्रमुख विजय चव्हाण ह्यांचेसह शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षीका,
शिक्षकेत्तर कर्मचारी ह्यांनी परिश्रम घेतले.
स्पर्धेचे उद्घाटन झाल्यावर नांदगाव संकुलाच्या एकांकिकाना सुरवात झाली .
सर्वप्रथम कि.माध्य.विद्यालय वाखारी ह्या शाळेची श्री.स्वप्निल महाले दिगदर्शित “शेवटची हाक पृथ्वीची” हि एकांकिका सादर झाली.
माध्य.विद्या.सावरगाव श्री भरत काकळीज दिग्दर्शित “शाळेने गाव तेथे गोंधळ” ही एकांकीका सादर केली. व्ही.जे.हायस्कूल शाळेने कु. गिरीजा वाघमारे लिखीतव सौ. रूपाली झोडगेकर दिग्दर्शित “दृष्टीकोन” तर सरस्वती विद्यामंदिर,मनमाड ह्या शाळेन श्रीम. धनश्री अहिरे दिग्दर्शित “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे” ही एकांकीका सादर केली. शेवटी छाजेड विद्यामंदिर शाळेने “WWW गणोबा .COM”हि श्री. दिपक नारळे दिग्दर्शित एकांकिका सादर केली. सरस्वती विद्यालय,मनमाड ह्या शाळेने सादर केलेली श्रीम. धनश्री अहिरे दिग्दर्शित “वृक्ष वल्ली आम्हा सोयरे” ह्या एकांकिकेला संकुलातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. या सर्व एकांकिकांना चांगला प्रतिसाद मिळाला. आलेल्या परीक्षकांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले व मार्गदर्शन केले . प्रथम आलेल्या एकांकिकेला आलेले मान्यवर परीक्षकांच्या ह्यांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले.
