
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३१२२ वा दिवस
तुम्ही पावित्र्य, नैतिकता, आणि भगवंतप्रेम हे आपले आदर्श कदापि खाली ओढू नका. तुमच्यावर वज्राघात झाला तरी तुम्ही भिऊ नका. उठा आणि कार्याला लागा आणि जोपर्यंत कार्यपूर्ती होत नाही तोपर्यंत थांबू नका. जिथे प्रामाणिक धारणा आहे आणि जिथे विशुद्ध हेतू आहे तिथे विजय हा ठेवलेलाच आहे. या दोघांनी संपन्न असलेले लोक संख्येने थोडेसेच जरी असले तरी ते सर्व प्रकारच्या अडचणींवर निश्चित मात करून विजयी होतील यात शंका नाही.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर २६ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण १३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ बुधवार दि. १७ डिसेंबर २०२५
★ १७४० पोर्तुगीजांच्या ताब्यातील वसईला किल्ला जिंकणारे, मराठा साम्राज्यातील पराक्रमी सेनापती चिमाजी आप्पा यांचा स्मृतीदिन.
★ २०१९ मराठी नाट्यसुष्टीतील जेष्ठ रंगकर्मी, मराठी, हिंदी चित्रपट अभिनेते, नटसम्राट डॉ. श्रीराम लागू यांचा स्मृतीदिन.
★ निवृत्ती हक्क दिन…
