
सायखेडा ( प्रतिनिधी) येथील जनता इंग्लिश स्कूल शाळेत कर्मवीर ॳॅड. विठ्ठलराव हांडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त इयत्ता सहावीच्या विद्यार्थ्यांनी बालसभेचे आयोजन कु. अवनी आघाव या विद्यार्थ्यांनीच्या अध्यक्षते खाली केले . यावेळी मंजरी गुजराथी, धनश्री कुटे,ॳॅड. हांडे साहेबांच्या जीवनाविषयी व त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याविषयी ची माहिती दिली.

याप्रसंगी स्टेज व्यवस्थापन आणि रांगोळी विद्यार्थ्यांनी छान केली. याशिवाय दुर्गा गावले,नलावडे, श्रेयस खालकर,या विद्यार्थ्यांनी भित्तीचित्रे तयार केली. या बालसभेचे सुत्रसंचलन दुर्वा शेलार व स्वामिनी कुटे यांनी छान केले. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य आर.व्ही. वाजे, उपप्राचार्य श्रीमती ए.जी. अहिरे, पर्यवेक्षक एस.एन.पगार हे व्यासपीठावर उपस्थित होते.वर्गशिक्षीका श्रीमती वृषाली अशोक शिंदे यांनी बाल सभेसाठी मार्गदर्शन केले.समर्थ मगर या विद्यार्थ्यांने आभार मानले.

