नाशिक:( प्रतिनिधी)- गेल्या वीस वर्षापासून गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री पद्मश्री स्मिता पाटील शब्दपेरा काव्यसंग्रह पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. नाशिक येथे जानेवारीत होणाऱ्या अ.भा.शेकोटी लोककला साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण १८ जानेवारी रोजी दुपारी १ वा.होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष रवींद्र मालुंजकर आणि प्रा.राजेश्वर शेळके यांनी दिली.
यंदाचा स्मिता पाटील शब्दपेरा पुरस्कार पुढील कवितासंग्रहांना जाहीर करण्यात आला आहे. रूपाली राऊत-अंतरीची आस (बोईसर), प्रवीण बोपूलकर-अवतरण चिन्ह (रायगड), सुरेश वंजारी-दशा (नागपूर), प्रदीप बडदे-माणुसकीची अंत्ययात्रा (मुंबई), रवी ठाकूर-शिल्लक कविता (नाशिक), सुजाता येवले-विठू माउली (नाशिक), प्रतिभा खैरनार-वंशावळीच्या प्राचीन सरीतून (नांदगाव), राजेंद्र दिघे-पाखरांची गाणी (मालेगाव), विद्या अटक-अलकांजली (पुणे), सुमती टापसे-स्पंदना (नाशिक), तात्याराव चव्हाण-भावतरंग (संभाजीनगर), बाळासाहेब भोर-प्रवरेच्या काठावरून (अहिल्यानगर), रमेश चौधरी-जीवनवेल (नाशिक), डॉ.सुरेश वाकचौरे-थडग्यातला सूर्य (पुणे), अशोक भालेराव-काहूर (नाशिक), गिरीजा भुमरे-हृदयातील पाझर (संभाजीनगर), विजया कांडेकर-हळवे मंतर (नाशिक), सरला सोनजे सरल तरंग (नाशिक), अनिल साबळे-आय हॅव नो मदरलॅण्ड (पुणे), प्रकाश पोळ-कातरवेळ (ठाणे), डॉ.नंदकुमार राऊत-कंजाळ (मुंबई), सुमन मुठे-अंधारदिवे (नाशिक), उदय सुभेदार-नूर ए गझल (पुणे), सरोज गाजरे-स्नेहदर्शन (ठाणे), रामदास गायधने-शब्द काव्याची सय (रायगड), मुकुंद परळीकर-केव्हा होता येईल सैल (वाशिम), मकरंद घाणेकर-मनस्वी (पुणे), विनायक कुलकर्णी-आभार वेदनांचे (सांगली), डॉ.अदिती काळमेख-जगणे गोंदून घेताना (सातारा), अश्विनी ब्रम्हनाथकर-शब्द अंतरीचे (परभणी), शरद घोडके-मधाचे बोट (नाशिक), मोहन लोंढे-पिळ (सांगली), मंगेश रेडीज-माझ्या हृदयातील शब्द (मुंबई), उषा भोसले-अंकुर (लातूर), वृषाली टाकळे-सफर कवितेची (पुणे), कविता मोरवणकर-उद्याचा दहशतगर्द अंधार (मुंबई), संगीता थोरात-दाही दिशा कवेत माझ्या (नागपूर) पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.