महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऊस तोडणीला वेग आला आहेत. बंजारा समाज इतर राज्यात जाऊन ऊस तोडणीचे काम करत आहेत .तसेच महाराष्ट्रातील बीड परभणी नांदेड जालना लातूर छत्रपती संभाजी नगर विदर्भ इ.या सर्व जिल्ह्यातील. बंजारा समाज आपल्या पोट भागवण्यासाठी हे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यामध्ये ऊस तोडणी काम करण्यासाठी आज सुद्धा मोठ्या प्रमाणात भटकत आहे. त्याचबरोबर त्यांची लहान चिमुकली ही सोबत आहेत .ऊस तोडीच्या या चार पाच महिन्याच्या काळात त्यांचे शिक्षण आणि बालपण उसाच्या फडातच जाते .बहुतांशी ठिकाणी महाराष्ट्र शासनाने साखर शाळा सुरू केल्या तरी त्या फक्त कागदपत्रावर दिसतात.
आई बापाच्या नशिबी आलेले 18 विश्व दारिद्र्य त्यांच्या माती देखील आपोआप येत असल्याचे चित्र आज समाजासमोर दिसत आहे . दिवाळी झाली की साखर कारखान्याचे हंगाम सुरू होताच. तांड्यातील सर्व बंजारा समाज आपल्या जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात व राज्यात कानाकोपऱ्यातून ऊस तोडणी कामाला स्थलांतर होतात.तसेच आपल्या कुटुंबासह मुकादम सांगेल त्या गावात दाखल होतात.आज कडाक्याच्या थंडीत पहाटेपासून सुरू झालेले ऊस तोडणीचे काम संध्याकाळपर्यंत अंधार पडेपर्यंत अविरत सुरू असते म्हणून बंजारा समाजाच्या बालपणाचे शिक्षण आई-वडिलांच्या उसाच्या फडात व त्याची चिमुकली मुल पाचटात दिवस राञ काढतात त्यांच्या सुरक्षेकडे कोणाचेही लक्ष नसते .
महाराष्ट्र शासनाने दरवर्षी या ऊस तोडणी कामगाराच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये .यासाठी कारखाने वा उसाच्या शेतीपत्यात साखर शाळांची मोहीम राबवते पण ते फक्त कागदावरच दिसून येते मात्र त्याची अंमलबजावणी योग्य होत नाही. ऊस तोडी बंजारा समाज आज सुद्धा मोठ्या प्रमाणात त्यांचे सहकुटुंब ऊस तोडी कामगारासाठी भटकंती करत आहे.व त्याच्या बालकाचा बौद्धिक क्षमता विकास हे उसाच्या फडातच कोयत्यासोबत होत आहे..
आजपर्यंत बंजारा समाजाला शासनाने विमुक्त जाती (अ) VJ-Aप्र वर्गात ठेवून बंजारा समाजावर अन्याय अनेक वर्षापासून करत आहे. सन 1921 च्या ऐतिहासिक नोंद आणि हैद्राबाद गॅझेट मध्ये बंजारा समाज हा आदिवासी म्हणून नोंदलेला आहे. त्यामुळे बंजारा समाजाला एस टी,(ST)प्रवर्गात समाविष्ट करा व बंजारा समाजाच्या मुलांचे शिक्षण हे उसाच्या फड्यातच न जावू देता चांगल्या इमारतीत शिक्षण दया .बंजारा समाजाच्या मुलाची भटकंती थांबवा. .
लेखनिर्मिता...............
प्रा. डॉ.सुनील काशीराम राठोड.
ता मुखेड जि नादेड...
MOB. 9623112097.