
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २८५९ वा दिवस जे सुकुमार आहे; शक्तीपूर्ण, आरोग्यपूर्ण, कुशाग्र बुद्धीयुक्त, तेजस्वी, दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे युवा आहेत, तेच परमेश्वराच्या जवळ जात असतात. असे वेदवचन आहे. नुकतेच उमललेले, कोणीही न हाताळलेले, सुवास न घेतलेले पुष्प ईश्वराच्या चरणी अर्पण करायचे असते. म्हणून उठा! स्वतःचे भवितव्य ठरविण्याचा तो क्षण हाच आहे. जोपर्यंत तुमच्यामध्ये तारुण्याची तडप आहे, जोवर तुम्ही थकले, भागलेले, गळलेले असे झाले नाहीत, उलट तारुण्याच्या उत्साहाने आणि टवटवीत मुसमुसलेले आहात, तोपर्यंतच निश्चय करा! उठा काम करा! हीच ती शुभ घडी आहे.
*स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर ७ चैत्र शके १९४७*★ फाल्गुन वद्य /कृष्ण १४
★ शालिवाहन शके १९४६
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२६
★ शुक्रवार दि. २८ मार्च २०२५ ★ १७३७ थोरले बाजीराव पेशवे यांनी दिल्लीवर स्वारी करुन मोगलांचा पराभव केला, दिल्लीत मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केले.
★ १९२५ मराठी सुप्रसिध्द अभिनेते राजा गोसावी यांचा जन्मदिन.
★ १९९२ जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू स्थानकवासी आचार्य सम्राट आनंद ऋषीजी यांचा स्मृतीदिन.


