
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३११२ वा दिवस
कर्मयोग्याचा कोणत्याही प्रकारच्या धर्ममतावर विश्वास असण्याची गरज नाही. फार काय पण प्रत्यक्ष ईश्वरावरही त्याचा विश्वास नसला तरीसुद्धा काहीच अडावयाचे नाही. तो आत्म्याचे अनुसंधान करो वा न करो, कोणत्याही प्रकारचे तात्त्विक चिंतन करो वा न करो, कशानेच काही बिघडणार नाही. त्याच्यासमोर निःस्वार्थतेची प्राप्ती हे त्याचे स्वतःचे असे एक विशिष्ट ध्येय असते, आणि ते त्याला स्वतःच्या प्रयत्नांनीच प्राप्त करून घ्यावयाचे असते. त्याच्या जीवनाचा प्रत्येक क्षण प्रत्यक्षानुभवाने उजळून जावयास हवा. कारण, जी समस्या सोडविण्यासाठी ज्ञानी आपल्या तर्कबुद्धीचा आणि स्फूर्तिमय अंतः प्रज्ञेचा उपयोग करीत असतो वा भक्त आपल्या भक्तिप्रेमाचा उपयोग करीत असतो, तीच समस्या त्याला कोणत्याही मताचे वा वादाचे साहाय्य न घेता केवळ कर्माने सोडवावयाची असते.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १६ अग्रहायण शके १९४७
★ मार्गशीर्ष वद्य /कृष्ण ३
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ रविवार दि. ७ डिसेंबर २०२५
★ संकष्ट चतुर्थी
★ १९४१ जेष्ठ कविवर्य भास्कर रामचंद्र ऊर्फ भा. रा. तांबे यांचा स्मृतीदिन
★ १९४९ भारतीय लष्कर ध्वज दिन “झेंडा दिन”
★ आंतरराष्ट्रीय नागरी विमानसेवा दिन
★ २०१३ जेष्ठ अभिनेते, दिग्दर्शक विनय आपटे यांचा स्मृतीदिन.
